AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
रब्बी/उन्हाळी कांदा रोपवाटिका नियोजन
गुरु ज्ञानAgroStar
रब्बी/उन्हाळी कांदा रोपवाटिका नियोजन
👉रब्बी आणि उन्हाळी कांद्याच्या योग्य रोपवाटिका नियोजनामुळे दर्जेदार रोपे मिळवणे शक्य होते. कांद्याच्या रोपवाटिकेत बियांची कमी उगवण, मुळांची सड, रोपांची पिवळसरता आणि पाने पीळ पडण्यासारख्या समस्या दिसून येतात. यासाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन निवडणे आवश्यक आहे. 👉गादीवाफ्यांचे नियोजन करून पाणी साचण्याचे प्रमाण कमी करता येते. 0.5 फूट उंच, 1 मीटर रुंद, व 3-4 मीटर लांबीचे गादीवाफे तयार करावेत. प्रत्येक वाफ्यात 3 किलो एसएसपी, 25 ग्रॅम मँडोझ, आणि 50 ग्रॅम ऍग्रोनिल जीआर मिसळावे. 👉बियांची ओळींमध्ये पेरणी करताना, 5 सें.मी. अंतर ठेवावे व माती आड करून पाण्याचे नियोजन करावे. रोपांना बुरशीजन्य रोगांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य अवस्थेनुसार फवारणी करावी. साधारणपणे 50-55 दिवसांनंतर रोपे पुनर्लागवडीस तयार होतात. 👉स्रोत:- AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
7
0
इतर लेख