AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना किंवा अनुदानाचा लाभ घेण्यासाठी करा हे काम!
समाचारAgrostar
योजना किंवा अनुदानाचा लाभ घेण्यासाठी करा हे काम!
➡️केंद्र सरकारने समाजातील प्रत्येक घटकांसाठी छोट्या-मोठ्या प्रकारच्या योजना आखल्या असून त्याची अंमलबजावणी देखील केली जात आहे. परंतु एका दृष्टीने विचार केला तर बऱ्याच प्रकारच्या योजना आहेत परंतु एका बाजूने सरकारने अनेक प्रकारचे वेगवेगळे नियम आणून एका दृष्टीने योजनांमध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला आहे. ➡️त्याचाच भाग म्हणून आता सरकारने आधार कार्डच्या संबंधित एक नियम अमलात आणला आहे तो म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे आधार कार्ड नसेल किंवा त्याने आधार क्रमांक नोंदणीसाठी अर्ज केला नसेल तर अनेक सरकारी योजनांचा लाभ आता संबंधित व्यक्तीला मिळू शकणार नाही. ➡️याबाबतीत युआयडीएआयने स्पष्ट केले आहे की, जर सरकारी योजना आणि त्यासंबंधीचे अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर आता आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे व एवढेच नाही तर त्या संबंधीचे परिपत्रक सर्व मंत्रालय आणि राज्य सरकारांना देखील जारी केले आहे. जा नागरिकांकडे आधार कार्ड असेल अशांना आता योजना आणि सबसिडीचा लाभ मिळावा असे देखील यामध्ये नमूद करण्यात आले आहे.दुसरी महत्त्वाची गोष्ट यामध्ये नमूद करण्यात आली आहे ती म्हणजे समजा तुमच्याकडे आधार कार्ड नसेल परंतु तुम्ही आधार नोंदणीसाठी प्रक्रिया केली असेल व त्याची पावती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. ➡️तुमच्याकडे नोंदणीची पावती असेल तरीसुद्धा तुम्हाला योजना किंवा अनुदानाचा लाभ मिळू शकणार आहे. या परिपत्रकाद्वारे निश्चित आहे की सबसिडीचा लाभ फक्त अशा नागरिकांना देण्यात येईल आधारशी लिंक आहेत किंवा देण्याच्या प्रक्रियेत आहेत. तसे आपल्याला माहित आहेच कि आधार कार्ड असल्यामुळे अनेक प्रकारचे फायदे आपल्याला मिळतात. ➡️उदाहरणच द्यायचे झाले तरआधार कार्डच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या प्रॉपर्टीचे व्यवहार करू शकतात तसेच आधार कार्ड धारकांसाठी बऱ्याच मालमत्तांचे व्यवहार पेपरलेस,कॅशलेस पद्धतीच्या झाले आहेत. तुम्हाला आधार कार्डच्या माध्यमातून ई हॉस्पिटलची सेवा देखील घेता येऊ शकते. ➡️संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
0
इतर लेख