AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना –उन्नत शेती समृद्ध शेतकरी या मोहिमेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान
किसान कृषि योजनाशेतकरी मासिक
योजना –उन्नत शेती समृद्ध शेतकरी या मोहिमेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान
१) कृषी उप अभियानाची उद्दिष्टे - राज्यातील वाढत्या लोकसंख्येबरोबर घटत चाललेली जमीन धारणा शेतीकामासाठी मजुरांची घटलेली संख्या व फळभागामधील विविधता या पार्श्वभूमीवर कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात चालना देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. २) योजनेचे स्वरूप –कृषी यंत्र सामुग्री व उपकरणे खरेदीसाठी अर्थसहाय्य(अनुदानावर कृषी अवजारे पुरवठा ) अल्प भूधारक,महिला लाभार्थी,अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना जास्तीत जास्त ५०टक्केपर्यंत अनुदान आहे व इतर लाभार्थ्यांना ४० टक्केपर्यंत अनुदान एकूण अनुदानापैकी ४० टक्के अनुदान हे ट्रक्टर या घटकासाठी करायचे असून उर्वरित अनुदान शासनाने निश्चित केलेल्या इतर अवजारांसाठी खर्च करण्यात येणार आहे. ३) योजनेची अंमलबजावणी- कृषी आयुक्तालयस्तरावर कृषी संचालक यांचे मार्फत योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. ४) लाभार्थी निवडीचे निकष –जिल्हाधिकारीयांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या जिल्हास्तरीय कार्यकारी समिती मार्फत लाभार्थीची निवड करण्यात येते.
५) आवश्यक कागदपत्रे -_x000D_ • शेतकऱ्याचा ७/१७ व ८ अ दाखला_x000D_ • आधारकार्ड ची झेरॉक्स_x000D_ • लाभार्थी अनुसूचित जाती जमातीचा असल्यास त्याची जातीच्या वैध प्रमाणपत्राची प्रत सदर करणे बंधनकारक _x000D_ • खरेदी करावयाच्या यंत्र/अवजाराची परीक्षण केल्याचा पुरावा म्हणून तपासणी संस्थेचे प्रमाणपत्र व अवजाराचे दरपत्रक सादर करणे बंधनकारक राहील _x000D_ ६)अधिक माहितीसाठी संपर्क-कृषी मंडळ कार्यालय,तालुका कृषी अधिकारी कार्यालय _x000D_ ७) www. Krushi.maharashtra .gov.in_x000D_ संदर्भ –शेतकरी मासिक
26
0