हवामान अपडेटअॅग्रोवन
येत्या ४ दिवसात 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता!
➡️ अरबी समुद्राच्या आग्नेय भागात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे. उद्या या क्षेत्राची तीव्रता अधिक वाढणार असून, त्याचे चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याचे संकेत आहे. त्यानंतर ते उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्याचा काहीसा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार आहे. येत्या काही दिवसांत राज्यात पूर्वमोसमीच्या सरीचा प्रभाव वाढणार असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
➡️ अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती तयार झाल्यानंतर राज्याला अधिक फटका बसणार नसला तरी केरळ, तमिळनाडू, कर्नाटक या राज्यांत १५ मेच्या दरम्यान अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. तसेच सुरुवातीला या चक्रीवादळामुळे वाऱ्याचा ताशी वेग ४० ते ५० किलोमीटर राहून तो हळूहळू वाढत जाईल. साधारणपणे ताशी ८० किलोमीटरपर्यंत वेगाने वारे वाहतील. त्यामुळे मासेमारीसाठी मत्स्य व्यवसायिकांनी आजपासून पुढील दोन ते तीन दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. तसेच अरबी समुद्र आणि दक्षद्वीप व मालदीव परिसर व हिंद महासागरातही वेगाने वाहणार असून, मॉन्सूनचे प्रवाह सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरण बनण्याची शक्यता आहे.
➡️ मॉन्सूनला सुरुवात होण्यासाठी काही दिवस बाकी असताना राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल होत आहे. काही ठिकाणी उन्हाचा चटका वाढत आहे. तर बहुतांशी ठिकाणी ढगाळ वातावरण बनून पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.
➡️ राज्यात या जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाची शक्यता:-
गुरुवार :- सिंधुदुर्ग, संपूर्ण विदर्भ
शुक्रवार :- रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, संपूर्ण मराठवाडा व विदर्भ
शनिवार :- रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, संपूर्ण मराठवाडा व विदर्भ
रविवार :- संपूर्ण महाराष्ट्र
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- अॅग्रोवन
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.