क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्तापुढारी
युरोपात ५८ हजार टन द्राक्ष निर्यात
देशातून चालू वर्षी य़ुरोपियन देशांमध्ये द्राक्षाच्या ४ हजार ३५८ कंटेनरमधून सुमारे ५८ हजार ३७० टन इतकी द्राक्षांची निर्यात झालेली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा असून सुमारे ५८ हजार ३१७ टन व त्यानंतर कर्नाटकमधून ५३ टन द्राक्षे निर्यात पूर्ण झाल्याचे ८ मार्चअखरेच्या केंद्र सरकारच्या अहवालात नमूद केले आहे. त्यापैकी प्रामुख्याने नेदरलॅंड ३८ हजार ६६१ टनांइतकी द्राक्ष निर्यात झालेली आहे. _x000D_ मागीलवर्षी हंगाम २०१८-१९ मध्ये ५ हजार १९३ कंटनेरमधून सुमारे ६९ हजार ६७७ टनाइतक्या द्राक्षांची निर्यात झाली होती. याचा विचार करता अदयापही चालूवर्षी ८३५ कंटेनर व सुमारे ११ हजार ३०७ टनाइतकी द्राक्ष निर्यात कमी झाली असल्याचे स्पष्ट होत आहे. _x000D_ युरोपियन युनियन व्यतिरिक्त मलेशिया, सिंगापूर,रशिया व आखाती देशातही द्राक्ष निर्यात सध्या सुरू आहे. थॉमसन सिडलेस, गणेश जातीच्या द्राक्षांची निर्यात सुरू आहे. एप्रिल महिनाअखेरपर्यंत द्राक्ष निर्यात सुरू राहण्याची अपेक्षा आहे. _x000D_ संदर्भ – पुढारी, ११ मार्च २०२० _x000D_ ही महत्वपूर्ण माहिती आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा. _x000D_
50
0
संबंधित लेख