AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
युरिया ऐवजी गोमुत्राचा या पद्धतीने करा वापर !
कृषी वार्ताAgrostar
युरिया ऐवजी गोमुत्राचा या पद्धतीने करा वापर !
➡️गोमूत्र नायट्रोजनची कमतरता पूर्ण करतो. त्यामुळे इतर खतांपेक्षा जैविक खतांचा वापर करणे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आहे. ➡️गोमूत्रामुळे पिकास कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. याचा वापर कीटकनाशक म्हणून देखील केला जातो. गोमूत्रामध्ये नायट्रोजन सोबत काही प्रमाणात फॉस्फरस देखील उपलब्ध असून नायट्रोजन पिकांसाठी अत्यंत महत्वाचे असते. ➡️युरियामध्ये मोठ्या प्रमाणात नायट्रोजन उपलब्ध असल्यामुळे शेतकरी युरियाचा वापर करत असतो. युरियाची टंचाई निर्माण होऊ लागली आहे. शेतकरी पिकांची उत्तम वाढ व्हावी म्हणून युरियाचा वापर करत असतो. युरियामध्ये जवळपास ४६% पर्यंत नायट्रोजन उपलब्ध असते, असे कृषी वैज्ञानिकांनी सांगितले आहे. मात्र आता युरियाच्या ऐवजी गोमूत्र वापरता येते हे वैज्ञानिकांनी देखील तपासून सांगितले आहे. ➡️गोमूत्राचे प्रमाण कसे असावे : 👉🏻1० दिवसांच्या पिकांसाठी ७०० मि.ली./ स्प्रेयर (१५ लीटर पाणी) 👉🏻३० दिवसांच्या पिकांसाठी २१०० मि.ली./ स्प्रेयर (१५ लीटर पाणी) 👉🏻४० दिवसांच्या पिकांसाठी ३००० मि.ली. / स्प्रेयर (१५ लीटर पाणी) 👉🏻५० किंवा त्यापेक्षा अधिक दिवसांच्या पिकांसाठी ३८०० मि.ली./ स्प्रेयर (१५ लीटर पाणी) 👉🏻 या प्रमाणात गोमूत्राची फवारणी केल्यास नायट्रोजनची कमतरता भरून निघते. 👉🏻यामुळे जमीन भुसभुशीत होण्यास मदत होते. 👉🏻पर्यावरणासाठी अत्यंत लाभदायी आहे. 👉🏻यामुळे पीक निरोगी राहते. ➡️संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
76
17
इतर लेख