AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
युरियाची आयात ४२ लाख टनांवर पोहचली
कृषी वार्ताअॅग्रोवन
युरियाची आयात ४२ लाख टनांवर पोहचली
नवी दिल्ली : भारताची चालू आर्थिक वर्षातील युरिया आयात नोव्हेंबर अखेरपर्यंत ४२.०३ लाख टनांवर पोचली आहे. या आयातीचा खर्च १ अब्ज डॉलरहून अधिक झाला आहे, अशी माहिती रसायने व खते राज्यमंत्री राव इंद्रजीतसिंह यांनी नुकतीच लोकसभेमध्ये दिली. राव इंद्रजीतसिंह म्हणाले, की सर्व खतांमध्ये केवळ युरियाच्या किंमतीवर सरकार नियंत्रण ठेवण्यात येते. याचबरोबर राज्य सरकारांच्या मालकीच्या कंपन्यांमार्फत युरियाची थेट आयात करण्यास परवानगी दिली जाते. ओमानमधून २० लाख टन युरिया आयात केला जात आहे. इफको आणि कृभको या कंपन्यांमार्फत ही आयात करण्यात येत आहे. चालू आर्थिक वर्षात नोव्हेंबर अखेरपर्यंत ४२.०३ लाख टन युरियाची आयात करण्यात आली आहे. ही आयात एकूण १ हजार ४८ दशलक्ष डॉलरची आहे.
युरिया वगळता इतर खतांची आयात खुल्या सर्वसाधारण परवान्याच्या माध्यमातून विविध कंपन्या करतात. व्यावसायिक गरजांप्रमाणे या कंपन्या खतांची आयात करतात. त्यामुळे या आयातीची नेमकी आकडेवारी सरकार ठेवत नसल्याचेदेखील त्यांनी यावेळी सांगितले. संदर्भ - अॅग्रोवन, २१ डिसेंबर २०१८
52
0