समाचारAgrostar
या योजनेद्वारे मिळणार लग्नासाठी पैसे!
➡️भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ची एक योजना आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी मोठा निधी तयार करू शकता. यामध्ये तुम्हाला काही काळ गुंतवणूक करावी लागेल आणि तुम्हाला मॅच्युरिटीवर पैसे मिळतील. LIC कन्यादान योजना ही अशीच एक योजना आहे ज्याद्वारे तुम्ही तुमच्या मुलीसाठी पैसे जोडू शकता आणि लग्नाच्या काळजीपासून मुक्त होऊ शकता.
➡️पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमचे वय किमान ३० वर्षे आणि मुलीचे वय एक वर्षापेक्षा कमी नसावे. ही पॉलिसी २५ वर्षांसाठी आहे परंतु तुम्हाला प्रीमियम फक्त २२ वर्षांसाठी भरावा लागेल. तुमची मुलगी एक वर्षापेक्षा जास्त वयाची असेल तेव्हाच तुम्ही ही पॉलिसी घेऊ शकता.
➡️आवश्यक कागदपत्रे:
1)आधार कार्ड
2)उत्पन्न प्रमाणपत्र
3)ओळखपत्र
4)पत्त्याचा पुरावा
5)पासपोर्ट आकाराचा फोटो
6)मुलीचे जन्म प्रमाणपत्र
➡️कन्यादान पॉलिसीमध्ये, तुम्हाला दररोज १५१ रुपये द्यावे लागतील, म्हणजेच तुम्हाला दरमहा ४५३० रुपये गुंतवावे लागतील. तुम्हाला २२ वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल आणि नंतर २५ वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्हाला ३१ लाख रुपये मिळतील. याद्वारे तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी चांगले पैसे जोडू शकाल.
➡️संदर्भ:-Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.