AgroStar
या योजनेत 50 रुपये गुंतवा, तब्बल 35 लाख मिळणार !
योजना व अनुदानAgrostar
या योजनेत 50 रुपये गुंतवा, तब्बल 35 लाख मिळणार !
👉🏻पोस्ट ऑफिसची गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. तुम्हालाही अशी गुंतवणूक हवी असेल जिथे चांगला नफाही मिळेल, आणि गुंतवणूक सुरक्षित देखील असेल तर पोस्ट ऑफिस तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. आज आम्ही आपणास पोस्ट ऑफिसच्या एका भन्नाट योजनेविषयी सांगणार आहोत ज्यात नाममात्र रक्कम गुंतवणूक करून आपण चांगली मोठी निधी जमा करू शकणार आहात. 👉🏻35 लाख रुपये मिळतील : पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरु शकतात. यामध्ये रिस्क फॅक्टरही कमी आहे आणि त्याच वेळी रिटर्नही चांगला मिळतो. मित्रांनो आम्ही ज्या योजनेबद्दल बोलत आहोत ती आहे पोस्ट ऑफिसची ग्राम सुरक्षा योजना. या योजनेत तुम्हाला दरमहा 1500 रुपये जमा करावे लागतील. ही रक्कम नियमितपणे जमा केल्यास आगामी काळात तुम्हाला 31 ते 35 लाखांचा फायदा होईल. 👉🏻येथे गुंतवणुक करण्याचे काही नियम आहेत : 👉🏻19 ते 55 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो. 👉🏻या योजनेअंतर्गत किमान विमा रक्कम 10,000 ते 10 लाख रुपये असू शकते. 👉🏻या प्लॅनचे प्रीमियम पेमेंट मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक केले जाऊ शकते. 👉🏻तुम्हाला प्रीमियम भरण्यासाठी 30 दिवसांची सवलत मिळते. 👉🏻या योजनेवर तुम्ही कर्जही घेऊ शकता. 👉🏻ही योजना घेतल्यानंतर 3 वर्षांनी तुम्ही ती सरेंडरही करू शकता. परंतु या स्थितीत तुम्हाला कोणताही लाभ मिळणार नाही. 👉🏻काय फायदा होणार : समजा एखाद्या व्यक्तीने वयाच्या 19 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक केली आणि 10 लाख रुपयांची पॉलिसी घेतली, तर त्याचा मासिक प्रीमियम 55 वर्षांसाठी 1515 रुपये, 58 वर्षांसाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये असेल. अशा परिस्थितीत, पॉलिसी खरेदीदाराला 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांसाठी 34.60 लाख रुपये मॅच्युरिटी लाभ मिळेल. 👉🏻संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
45
16
इतर लेख