AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
‘या’ योजनेत फक्त ५५ रुपये जमा करून मिळवा ३६ हजार!
योजना व अनुदानTV9 Marathi
‘या’ योजनेत फक्त ५५ रुपये जमा करून मिळवा ३६ हजार!
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेन्शन योजनेंतर्गत असंघटित क्षेत्रातील सुमारे ४६ लाख कामगारांनी नोंदणी केलीय. या योजनेंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगारांना वयाच्या ६० वर्षी ५,७७,२९५ कामगारांनी योजनेअंतर्गत नोंदणी केलीय. ५५ ते २०० रुपयांपर्यंत हप्ता! या योजनेत विविध वयोगटानुसार ५५ ते २०० रुपये मासिक योगदान देण्याची तरतूद आहे. जर तुम्ही वयाच्या १८ व्या वर्षी या योजनेत सामील झालात तर तुम्हाला दरमहा ५५ ​रुपये योगदान द्यावे लागेल. त्याच वेळी ३० वर्षांच्या व्यक्तींना १०० रुपये आणि ४० वर्षांच्या व्यक्तींना २०० रुपये योगदान द्यावे लागेल. अशी करा नोंदणी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजनेत नोंदणीसाठी जवळच्या CSC केंद्राला भेट द्यावी लागेल. यानंतर IFSC कोडसोबत आधार कार्ड आणि बचत खाते किंवा जन धन खाते द्यावे लागेल. पासबुक, चेकबुक किंवा बँक स्टेटमेंट पुरावा म्हणून दाखवता येईल. खाते उघडण्याच्या वेळी तुम्ही नामनिर्देशित व्यक्ती देखील प्रविष्ट करू शकता. उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा कमी असावे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बचत खाते असणे आवश्यक आहे. याशिवाय तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. यामध्ये गुंतवणुकीचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षे आहे. याशिवाय बँकेला संमतीपत्र द्यावे लागेल. जे मजूर इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत नाहीत ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेत अर्ज करणाऱ्या शेतमजुराचे मासिक उत्पन्न १५००० रुपयांपेक्षा कमी असावे. कोणताही मजूर कामगार विभाग, LIC, EPFO ​​च्या कार्यालयात जाऊन या योजनेची माहिती घेऊ शकतो. अधिक माहितीसाठी तुम्ही www.maandhan.in ला भेट देऊ शकता किंवा हेल्पलाइन क्रमांक १४४३४ वर कॉल करू शकता. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ:- TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
26
9
इतर लेख