क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताकृषी जागरण
या योजनेतून मिळेल ट्रॅक्टर खरेदी साठी ५ लाख रुपयांचे अनुदान!
 जर केंद्र सरकारचा विचार केला तर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या साठी केंद्र सरकार तसेच केंद्र सरकारच्या मदतीने विविध राज्य सरकारे शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत आहेत.  त्यातीलच एक महत्त्वाची योजना म्हणजे कृषी यांत्रिकीकरण ही होय. योजना केंद्र पुरस्कृत आहे तसेच योजना राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये लागू आहे.  या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारची अवजारे जसे पावर विडर, कल्टीवेटर, पलटी नांगर, शुगर केन फ्रेश कटर, मिनी राईस मिल, मिनी डाळ मिल इत्यादी विविध प्रकारची अवजारे अनुदान तत्वावर दिली जातात.  या योजनेतून ट्रॅक्टर साठी रुपये 2 लाखांपासून ते 5 लाखापर्यंत अनुदान देय आहे. तसेच शेतीसाठी लागणाऱ्या इतर अवजारांना देखील 12 हजार रुपयांपासून ते 3 लाखांपर्यंतच्या अनुदान दिले जाते.  यामध्ये राज्य सरकार देखील आपल्या वाट्याला येत असून शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी सर्व प्रकारच्या अर्थ सहाय्य करीत आहेत. राज्यातील नंदुरबार, उस्मानाबाद, वाशिम आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा आकांक्षी जिल्हे म्हणून समावेश केला असून इथल्या शेतकऱ्यांना अनुदानाचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत वेगळे आहे.  प्रत्येक अवजारांसाठी अनुदानाची योजना वेगवेगळे असल्याकारणाने त्याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी krushi -vibhag या लिंक वर जाऊन माहिती द्या. लागणारी आवश्यक कागदपत्रे:  या योजनेसाठी सातबारा उतारा, 8 अ उतारा, आधार लिंक असलेले बँक पासबुक, आधार कार्ड, विकत घेतात असलेल्या यंत्र अवजारांचा मान्यताप्राप्त तपासणी संस्थेचा तपासणी अहवाल, अनुसूचित जाती आणि जमातीसाठी लाभार्थींसाठी जातीचा दाखला, पासपोर्ट आकाराचे फोटो इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता या योजनेसाठी असते.  या योजनेसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. इतर कुठल्याही पद्धतीने भरलेले अर्ज ग्राह्य धरले जात नाहीत.  आपले सरकार डीबीटी मुखपृष्ठ पाण्यासाठी आपले सरकार डीबीटी च्या https://mahadbtmahit.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा.  शेतकरी कुठूनही आपले सरकार डीबीटी पोर्टल वरून कृषी यांत्रिकीकरण योग्य साठी अर्ज करू शकतात. तसेच आपण केलेल्या अर्जाची स्टेटस जाणून घेण्यासाठी यूजर आयडी वापरुन कधीही त्याबद्दलची माहिती पाहू शकतात. संदर्भ - कृषी जागरण, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
499
51
संबंधित लेख