कृषी वार्तान्यूज18
या योजनेतंर्गत 11 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात 93,000 कोटी रुपये जमा!
सरकारने शेतीत मदत करण्यासाठी देशातील ११ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ९३ हजार कोटी रुपये पाठवले आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या सरकारने एवढी मोठी रक्कम थेट शेतकऱ्यांना दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेमुळे हे शक्य झाले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, यावर्षी नोव्हेंबरपर्यंत एकूण मदतीची रक्कम एक लाख कोटींपेक्षा जास्त होईल.आता कोणताही शेतकरी यात कोणत्याही वेळी नोंदणी करून लाभ घेऊ शकतो. त्याअंतर्गत वर्षाकाठी ६ हजार रुपयांची मदत दिली जाते. गेल्या दीड महिन्यांतच ८.८० कोटी लोकांना २-२ हजार रुपये पाठवण्यात आले आहेत. कोरोना संक्रमण काळातही ही रक्कम शेतकऱ्यांना मदतीसाठी खूप कामाला आली आहे. हे सर्व पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) च्या माध्यमातून पाठवले जात आहेत, जेणेकरुन हे पैसे शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा व्हावेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकेल यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे. कसा लाभ घेऊ शकाल - पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत कुटुंबाच्या व्याख्येत पती, पत्नी आणि अल्पवयीन मुले आहेत. महसूल रेकॉर्डमध्ये ज्या प्रौढ व्यक्तीचे नाव नोंदवले आहे, तो व्यक्ती स्वतंत्रपणे त्याचा लाभ घेऊ शकतो. यासाठी महसूल नोंदी व्यतिरिक्त आधार कार्ड आणि बँक खाते क्रमांक आवश्यक असेल. असा करा अर्ज - योजनेंतर्गत तुम्ही घरबसल्या ऑनलाइन अर्ज करू शकता. अर्जाची स्थिती जाणून घ्यायची असल्यास किंवा त्यामध्ये काही बदल करायचे असल्यास ते फक्त क्लिकवर करू शकता. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला www.pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जावे लागेल. वेबसाइटच्या पहिल्या पानावरच उजव्या बाजूला मोठ्या अक्षरात फार्मर्स कॉर्नर लिहिलेले आहे. तुमचे नाव सूचीमध्ये आहे की नाही हे पाहायचे असल्यास लाभार्थी यादीवर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्ही राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गावाचे नाव भरून आपले नाव तपासू शकता. तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला असेल आणि त्यासंबंधी स्थिती जाणून घ्यायची असल्यास Beneficiary status वर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्ही आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल नंबर टाकून तुमची सद्यस्थिती जाणून घेऊ शकता. तुमच्या अर्जाची स्थिती पीएम-किसनच्या ०११-२४३००६०६ या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून देखील जाणून घेऊ शकता. या क्रमांकावर कॉल करून तुम्ही अर्ज करूनही पैसे का मिळाले नाहीत हे देखील माहिती करू शकता. संदर्भ - २२ सप्टेंबर २०२० न्यूज १८, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
142
10
इतर लेख