AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
या' योजनेअंतर्गत वर्षाला मिळणार 42 हजार!
कृषी वार्तामराठी आरोग्य
या' योजनेअंतर्गत वर्षाला मिळणार 42 हजार!
➡️नवीन वर्षामध्ये १० व्या हप्त्याची रक्कम अदा करण्यात आलेली आहे. याच पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ३६ हजार रुपये मिळतील अशी ही एक योजना सरकारने सुरू केली आहे. ➡️केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दर महिन्याला तीन हजार रुपये देणारी योजना सुरू केली आहे.त्यानुसार वर्षाला या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना ३६ हजार रुपये मिळतात. ➡️शिवाय पी एम किसान योजनेचे वर्षाला ६ हजार रुपये मिळून तुम्हाला वर्षाला ४२ हजार रुपये मिळू शकतात.मात्र यासाठी सरकारच्या काही अटींची पूर्तता करावी लागेल त्या योजनेचे नाव आहे पी एम किसान मानधन योजना. ही योजना शेतकऱ्यांना निवृत्तीवेतनाच्या स्वरूपात दरमहा ३ हजार रुपये दिले जातील. ➡️या योजनेसाठी ज्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळत आहे त्यांना अर्ज करण्याची गरज नाही. त्यांना वेगळी कोणतेही कागदपत्रे जमा करण्याची गरज नाही, कारण सरकारकडे शेतकऱ्यांचे सर्व माहिती जमा आहे. ➡️पी एम किसान योजना सध्या मिळत असलेला लाभा सोबतच निवृत्तिवेतन स्वीकारण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना कोणतेही वेगळे पैसे जमा करण्याची गरज राहत नाही. या निवृत्तीवेतनाच्या योजनेचा हप्ता आपोआप पीएम किसान योजनेतून कपात होतो. या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो? 1 निवृत्तीवेतनाच्या योजनेसाठी पात्र होण्यासाठी संबंधित शेतकऱ्याचे वय १८ ते ४० वर्षे असायला पाहिजे 2 तसेच त्याच्या नावावर दोन हेक्‍टरपर्यंत शेती असायला हवी 3 शेतकऱ्याच्या वयानुसार वीस ते चाळीस वर्षासाठी शेतकऱ्याला ५५ रुपये दोनशे रुपये मासिक योगदान भरावे लागते 4 यानंतर हा शेतकरी साठ वर्षाच्या झाल्यानंतर त्याला दरमहा ३००० रुपये निवृत्तिवेतन मिळणार आहे. संदर्भ:- मराठी आरोग्य, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
73
11
इतर लेख