योजना व अनुदानAgrostar
या' योजनेअंतर्गत मिळवा मोफत शिलाई मशीन !
👉🏻पीएम मोफत शिलाई मशीन योजना २०२२ अंतर्गत, महिलांना फक्त अर्ज करणे आवश्यक आहे. ही योजना प्रत्येक राज्यातील ५०,००० महिलांच्या सोयीसाठी तयार करण्यात आली आहे.
👉🏻पीएम मोफत सिलाई मशीन योजना देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची संधी देईल. भारतातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी हे एक चांगले पाऊल ठरू शकते. पीएम मोफत शिलाई मशीन योजना २०२२ अंतर्गत, २० ते ४० वयोगटातील महिलांना शिलाई मशीन घेण्यासाठी एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही.
👉🏻मोफत शिलाई मशीन : या योजनेत गाव आणि शहरातील महिलांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, जन्मतारीख, उत्पन्नाचा दाखला, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचा फोटो, दिव्यांगांसाठी अद्वितीय अपंगत्व ओळखपत्र आणि विधवांसाठी विधवा प्रमाणपत्र आवश्यक असेल.
👉🏻अर्ज कसा करायचा :
👉🏻सर्व प्रथम तुम्ही त्याच्या अधिकृत वेबसाइट https://www.india.gov.in वर जा.
👉🏻 होम पेजवर, शिवणकामाच्या मोफत पुरवठ्यासाठी अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.
👉🏻अर्जाच्या PDF ची प्रिंट काढा.
👉🏻त्यानंतर त्यात तुमचा तपशील टाका.
👉🏻 शेवटी तुम्हाला तुमची कागदपत्रे जोडावी लागतील.
👉🏻अर्जाची केली जाईल छाननी : अर्ज सबमिट केल्यानंतर, कार्यालयातील अधिकारी तुमच्या पत्राची तपासणी करतील. तपासणी केल्यानंतर, तुम्हाला मोफत शिलाई मशीन दिले जाईल.
👉🏻संदर्भ:- AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.