AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
या योजनेअंतर्गत तीन लाख शेतकऱ्यांना 1800 कोटी !
समाचारAgrostar
या योजनेअंतर्गत तीन लाख शेतकऱ्यांना 1800 कोटी !
➡️नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तीन लाख शेतकऱ्यांना अजून अठराशे कोटी रुपये मदत दिली जाण्याची शक्यता आहे. ➡️हवामानातील प्रतिकूल बदल यामुळे शेतीत अनेक प्रकारची संकटे उद्भवतात. या संकटांना सामोरे जाता यावे यासाठी शेतकरी आणि शेती या दोन्ही घटकांना सक्षम बनविण्याचे उद्दिष्ट या प्रकल्पाचे आहे. सन 2018 राज्यातील पाच हजार 142 गावांमध्ये हा प्रकल्प राबवला जात असून 2024 पर्यंत चालू राहणार आहे. या प्रकल्पातून शेती व शेतकऱ्यांसाठी जवळ जवळ चार हजार कोटी रुपये खर्च केले जाणार असून यातील 70 टक्के निधी हा जागतिक बँकेकडून कर्जाऊ घेण्यात आला आहे. ➡️नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना प्रकल्पाची वैशिष्ट्ये : 1- आधार लिंक बँक खात्यामध्ये अनुदानाचे ट्रान्सफर 2- शून्य डेटा एंट्री ऑपरेटर असलेला राज्यातील एकमेव प्रकल्प 3- प्रत्येक कामाचे आणि लाभाचे रिअल टाईम म्हणजेच त्याच वेळी जिओ टॅगिंग 4- शेतकऱ्यांनी संबंधित काम पूर्ण करताच मागणीनंतर पाच दिवसात अनुदान खात्यात जमा 5- शेतकऱ्यांना त्यांच्या अनुदान प्रस्तावाची तात्काळ माहिती 6- कृषी सहाय्यकांकडून एकही अहवाल न मागणारा प्रकल्प 7- गावनिहाय लाभार्थ्यांची यादी रोज अपडेट व खुली ठेवणारी पद्धत. ➡️ संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
33
5
इतर लेख