AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
या योजनेअंतर्गत आपल्या खात्यात येतील दरमहा ४९५० रुपये !
योजना व अनुदानAgrostar
या योजनेअंतर्गत आपल्या खात्यात येतील दरमहा ४९५० रुपये !
➡️जर तुम्ही सुरक्षित योजनेत पैसे जमा करून दरमहा पैसे कमवण्याचा मार्ग शोधत असाल तर पोस्ट ऑफिसच्या छोटया बचतीवर एक नजर टाका पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेमुळे गुंतवणूकदारांना दरमहा ठराविक रक्कम कमावण्याची संधी मिळते.या योजने अंतर्गत सिंगल आणि जॉइंट अकाउंट उघडण्याची सुविधा आहे निवृत्तीनंतर पेन्शनसाठी अनेक जण या योजनेचा लाभ घेत आहेत. ➡️पोस्ट ऑफिसची योजना असल्याने ती पूर्णपणे जोखीममुक्त आहे.जास्तीत जास्त 9 लाख जमा केले जाऊ शकतात POMIS मध्ये सिंगल आणि जॉइंट सुविधा दिली आहे एकाच खात्याद्वारे जास्तीत जास्त साडेचार लाख रुपयांची गुंतवणूक करता येते जर संयुक्त खाते असेल तर तुम्ही जास्तीत जास्त 9 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. ➡️मासिक पैसे कसे मिळतील : सध्या पीओएमआयएसचा वार्षिक व्याजदर 66 टक्के आहे संयुक्त खात्यामार्फत तुम्ही योजनेत ९ लाख रुपये जमा केले असतीत, तर वार्षिक ६६ टक्के व्याजदराने वर्षभरासाठीचे एकूण व्याज ५९,४०० रुपये असेल ही रक्कम वर्षांच्या १२ महिन्यांत वितरित केली जाईल अशा प्रकारे प्रत्येक महिन्याचे व्याज सुमारे 4950 रुपये असेल हे लक्षात ठेवा की जर तुम्ही एकाच खात्याद्वारे 4,50,000 लाख रुपये जमा केले तर मासिक व्याज 2475 रुपये होईल. ➡️POMIS खाते कसे उघडावे : यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये बचत खात असणे आवश्यक आहे कागदपत्रातील ओळखपत्रासाठी आधार कार्ड किंवा पासपोर्ट किंवा मतदार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स वैध आहे पासपोर्ट आकाराची छायाचित्रे सरकारने जारी केलेले ओळखपत्र किंवा युटिलिटी बिले पत्त्याच्या पुराव्यासाठी वैध आहेत ही कागदपत्रं असतील तर पोस्ट ऑफिसमध्ये जाऊ पीओएमआयएसचा फॉर्म भरावा लागतो तुम्ही ते ऑनलाइन डाऊनलोडही करू शकता फॉर्म भरण्याबरोबरच नॉमिनीचे नावही द्यावे लागणार आहे हे खाते उघडण्यासाठी सुरुवातीला 1000 रुपये रोख किंवा चेकद्वारे जमा करावे लागतील. योजना कोणासाठी सर्वोत्तम आहे : 👉🏻ही योजना 5 वर्षांची आहे. जी आणखी 5-5 वर्षांसाठी वाढवता येऊ शकते म्हणजेच मासिक उत्पन्नाचा लाभ आयुष्यभर घेऊ शकतो 👉🏻यामध्ये तुम्हाला तुमच्या ठेवीवर दरवर्षी मिळणार व्याज 12 भागांमध्ये विभागले जात ज्यानंतर मासिक आधारावर पैसे तुमच्या खात्यात ट्रान्सफर केले जातात. 👉🏻जर तुम्ही एका महिन्यात पैसे काढले नाहीत, तर ते मुद्दत रकमेशीही जोडले जाते आणि त्यावरही व्याज मिळते. 👉🏻कोणताही भारतीय नागरिक पीओएम आयएसमध्ये गुंतवणूक करू शकतो ज्या गुंतवणूकदारांना दर महिन्याला फिक्स्ड इनम हवी आहे त्यांच्यासाठी ही एक चांगली योजना आहे. ➡️संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
31
8
इतर लेख