AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
या' योजनेंतर्गत 80 कोटी लोकांना मोफत रेशन!
समाचारTV9 Marathi
या' योजनेंतर्गत 80 कोटी लोकांना मोफत रेशन!
➡️ कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या दरम्यान केंद्र सरकारने रेशन कार्ड धारक कुटुंबांना दिलासा देण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना लागू केलीय. या अंतर्गत ८० कोटींपेक्षा अधिक लाभार्थ्यांना सामान्य कोट्यात उपलब्ध अन्नधान्यांव्यतिरिक्त दरमहा ५ किलो अतिरिक्त अन्न धान्य दिले जात आहे. ➡️ सरकारी निवेदनानुसार, या योजनेंतर्गत सुमारे ६०० लाख टन म्हणजे 6 कोटी अन्नधान्य मोफत वितरणासाठी वाटप करण्यात आले होते. ➡️ राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत केंद्र सरकार ८० कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांना दिलेल्या सामान्य कोट्यापेक्षा जास्त दरमहा प्रतिव्यक्ती पाच किलो अन्नधान्य अतिरिक्त प्रमाणात मोफत देत आहे. सुरुवातीला पीएमजीकेवाय अंतर्गत हा अतिरिक्त विनामूल्य लाभ तीन महिन्यांच्या कालावधीसाठी (एप्रिल-जून २०२०) प्रदान करण्यात आला. ➡️ संकट कायम राहिल्याने कार्यक्रम आणखी पाच महिन्यांसाठी (जुलै-नोव्हेंबर २०२०) वाढवण्यात आला. साथीच्या दुसऱ्या लाटेच्या प्रारंभाच्या वेळी, पीएमजीकेवाय पुन्हा एकदा दोन महिन्यांसाठी (मे-जून २०२१) पुन्हा सुरू करण्यात आला आणि पुढील पाच महिन्यांच्या कालावधीसाठी (जुलै-नोव्हेंबर २०२१) आणखी वाढवण्यात आला. ➡️ चौथ्या टप्प्यात नोव्हेंबरपर्यंत धान्य उपलब्ध होणार भारत सरकारने आतापर्यंत चार टप्प्यांत पीएमजीकेएवाय योजनेंतर्गत सुमारे ६०० लाख टन अन्नधान्याचे वाटप केले. योजनेंतर्गत सर्व टप्प्यांमध्ये केलेल्या एकूण वाटपांपैकी १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत ८२.७६ टक्के अन्नधान्य उचलले गेले होते. चौथा टप्पा नोव्हेंबर २०२१ मध्ये संपेल. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
24
5