AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
 'या' योजनेंतर्गत ट्रॅक्टर खरेदीवर मिळतय 50% अनुदान
योजना व अनुदानAgrostar
'या' योजनेंतर्गत ट्रॅक्टर खरेदीवर मिळतय 50% अनुदान
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपणा जाणून घेऊया केंद्र सरकारच्या 'पीएम किसान ट्रॅक्टर योजने' अंतर्गत हे अनुदान दिले जात आहे. चला तर मग या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊयात. 👉🏻पीएम किसान ट्रॅक्टर योजना खर तर, शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी ट्रॅक्टर अत्यंत आवश्यक आहे. मात्र देशात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे ट्रॅक्टर नाही. अशा भीषण परिस्थितीत त्यांना ट्रॅक्टर भाड्याने किंवा बैलांचा वापर करावा लागतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे. पीएम किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर दिले जातील. 👉🏻शेतकऱ्यांना मिळणारं 50% अनुदान केंद्र सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुदान देते. याअंतर्गत शेतकरी कोणत्याही कंपनीचे ट्रॅक्टर अर्ध्या किमतीत खरेदी करू शकतात. उर्वरित निम्मी रक्कम सरकार अनुदान म्हणून देते. याशिवाय अनेक राज्य सरकारही त्यांच्या स्तरावर शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवर 20 ते 50 टक्के सबसिडी देते. 👉🏻कसा घ्याल योजनेचा लाभ? हे अनुदान सरकार फक्त 1 ट्रॅक्टर खरेदीवर देईल. तुम्हालाही योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे म्हणून शेतकऱ्याकडे आधार कार्ड, जमिनीचे कागद, बँक तपशील, पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी जवळच्या कोणत्याही CSC केंद्राला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. 👉🏻संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
144
32