हवामान अपडेटAgrostar
या भागांत पूर्वमोसमी पावसाची शक्यता!
⛈️देशासह राज्यात वातावरणात सातत्याने बदल होताना दिसून येत आहेत. काही भागात उष्णतेची लाट आहे. तर राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांत 31 मेपर्यंत अवकाळी पाऊस बरसणार आहे. तर, राज्यातील बहुतांश शहरांचा कमाल तापमानाचा पारा चाळीस अंशांपर्यंत घसरला आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
⛈️ मान्सूनची आगेकूच होण्यास अनुकूल वातावरणअसल्यामुळे येत्या दोन दिवसांत पाऊस अंदमान, निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग व्यापणार आहे. राजस्थान ते मध्य प्रदेशपर्यंत चक्रिय स्थिती तयार झाली आहे. तर दक्षिण भारताकडून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे वाहत आहेत. या स्थितीमुळे राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे.
⛈️दक्षिण भारतातील काही भागातही पाऊस हजेरी लावणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्याच्या जवळपास सर्वच भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस बरसणार आहे. काही भागांत अवकाळी मुसळधार बरसेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद याठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
⛈️तर दक्षिण भारतातील काही भागातही पाऊस हजेरी लावणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. राज्याच्या जवळपास सर्वच भागांमध्ये मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस बरसणार आहे.
⛈️संदर्भ:- Agrostar
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.