AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
या बिझनेसमधून होईल बंपर कमाई !
व्यवसाय कल्पनाAgrostar
या बिझनेसमधून होईल बंपर कमाई !
➡️जर तुम्ही 10 ते 6 या वेळेतली नोकरी करून थकला असाल आणि तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला एखादा बिझनेस करायचा असेल, तर आम्ही तुम्हाला एक भन्नाट आयडिया सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही चांगली कमाई करू शकाल. कमी पैसे गुंतवून हा बिझनेस सुरू करता येतो आणि महिन्याभरात तुम्ही भरपूर कमाई करू शकता. साबण तयार करण्याची फॅक्टरी सुरू करण्यासाठी अत्यंत कमी खर्च येतो. साबण तयार करण्याचा कारखाना काढून हा व्यवसाय सुरू करता येतो. ➡️या बिझनेससाठी तुम्हाला केंद्र सरकारकडून मदत देण्यात येईल. सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत तुम्हाला हा बिझनेस सुरू करण्यासाठी सहज कर्ज मिळेल. आजच्या काळात साबणाची मागणी खेड्यांपासून शहरांपर्यंत सगळीकडेच आहे. अशा परिस्थितीत साबण तयार करण्याचा बिझनेस तुमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. साबणाची फॅक्टरी 4 लाख रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करून सुरू करता येते. ➡️तुम्हाला 80 टक्के लोन मिळू शकतं : हा बिझनेस सुरू करण्यासाठी 80 टक्के लोनही मिळू शकते. केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेंतर्गत लोन मिळणं सोपं आहे. ते मिळण्यासाठी पूर्ण बिझनेसचा प्रॉजेक्ट रिपोर्ट सादर करावा लागतो. 7 महिन्यांत तुम्ही त्याची औपचारिकता पूर्ण केल्यानंतर उत्पादन सुरू करू शकता. मुद्रा योजनेच्या प्रॉजेक्ट प्रोफाइल रिपोर्टनुसार, तुम्ही एका वर्षात एकूण 4 लाख किलो साबण उत्पादन करू शकाल. त्याची एकूण किंमत सुमारे 47 लाख रुपये असेल. ➡️वार्षिक कमाई 6 लाख रुपये : उत्पादन खर्च आणि लोन किंवा इतरांकडून घेतलेले पैसे भरल्यानंतर, तुम्हाला दरवर्षी 6 लाख रुपयांचा नफा होईल. हे युनिट सुरू करण्यासाठी, तुम्हाला एकूण 750 स्क्वेअर फूट जागा लागले. त्यापैकी 500 स्क्वेअर फूट कव्हर करण्यात येणार असून, उर्वरित जागा मोकळी लागेल. यासाठी मशिन्ससह एकूण 8 उपकरणं लागतील. मशिन्स आणि त्यांच्या फीटिंगचा एकूण खर्च एक लाख रुपये असेल. ➡️ संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
1
इतर लेख