AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
या पिकांच्या आवकेत वाढ!
बाजार बातम्याअ‍ॅग्रोवन
या पिकांच्या आवकेत वाढ!
➡️खरीप हंगामातील सोयाबीनची काढणी आणि मळणीची कामे पूर्णत्वास केली गेली आहेत. गेल्या आठवड्यात ५०१ क्‍विंटल सोयाबीनची आवक झाली. परंतु दर अपेक्षितरित्या सुधारले नाही. परिणामी शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणण्याचा निर्णय घेतला आहे. ➡️सुरुवातीच्या ५०१ क्विंटल वरून १०४७, ११४१ व आता १५८५ क्‍विंटलवर बाजारातील आवक पोचली आहे. गेल्या आठवड्यात सोयाबीनचे दर ५००० ते ६३०० रुपये होते. या आठवड्यात हेच दर ४८०० ते ६४५० रुपयांवर पोचले आहेत. व्यापाऱ्यांकडून मात्र यापुढील काळात सोयाबीन दरात सुधारणा होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. ➡️बाजारात गव्हाची देखील नियमीत आवक आहे. गेल्या आठवड्यात गव्हाला १८४० ते २१०२ रुपये असा दर होता. या आठवड्यात १८८६ ते २१४० रुपयांवर हे दर पोचले. गव्हाची आवक २०० क्‍विंटल इतकी अत्यल्प आहे. ➡️तांदूळ आवक १०० क्‍विंटल तर दर ४५०० ते ४८०० रुपये असे होते. बाजारात हरभऱ्याची देखील आवक होत असून ती १०९ क्‍विंटल आहे. ४००० ते ४६५१ या दराने हरभरा व्यवहार होत असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. ४३५० ते ४४११ असा हरभऱ्याला गेल्या आठवड्यात दर होता. त्यामुळे हरभरा दर स्थिर राहतील, अशी देखील अपेक्षा आहे. ➡️तुरीच्या दरात किरकोळ घसरण अनुभवण्यात आली. गेल्या आठवड्यात ६००६ ते ६२१६ रुपये असा तुरीचा दर होता या आठवड्यात दरात घसरण अनुभवण्यात आली. ५७०० ते ६००० रुपये याप्रमाणे तुरीला दर मिळाला. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
1