AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
या तारखेपर्यंत येणार पी एम किसानचा पुढील हप्ता!
कृषी वार्तान्यूज १८ लोकमत
या तारखेपर्यंत येणार पी एम किसानचा पुढील हप्ता!
➡️तुम्ही देखील शेतकरी सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. लवकरच तुमच्या खात्यात या योजनेचा पुढील हप्ता येणार आहे. शेतकऱ्यांना लवकरच ही आनंदाची बातमी मिळणार आहे. मीडिया अहवालांच्या मते पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा दहावा हप्ता पाठवण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. हा हप्ता ट्रान्सफर करण्याची तारीखही निश्चित करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यात येणार ४००० ➡️जर तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असाल आणि तरी देखील आधीचा हप्ता तुम्हाला मिळाला नसेल तर त्यांना आता हा आधीचा हप्ता मिळेल. जारी होणाऱ्या पुढील हप्त्यासह तुम्हाला आधीच्या हप्त्याची रक्कमही मिळेल, अर्थात तुमच्या खात्यात ४००० मालामाल! दिवाळीतच मिळते ही संधी पात्र शेतकरी अशाप्रकारे करू शकतील नोंदणी -याकरता शेतकऱ्यांना pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. -त्यानंतर त्याठिकाणी दिसणाऱ्या 'फार्मर कॉर्नर' या टॅबवर क्लिक करा. याठिकाणी जाऊन तुम्ही तुमच्या नावाची या योजनेसाठी नोंदणी करू शकता. -याठिकाणी 'New Farmer Registration' या पर्यायावर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक टाका -कॅप्चा कोड प्रविष्ट करून तुमचे राज्य निवडा, त्यानंतरच प्रोसेस पुढे जाईल -तुमची वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील, शेतीविषयक तपशील विचारला जाईल -ही माहिती भरल्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
6
2
इतर लेख