AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
या जिल्ह्यासाठी आता पाच लाखांपर्यंत शून्य टक्क्यांनी कर्ज मिळणार!
कृषी वार्तालोकमत
या जिल्ह्यासाठी आता पाच लाखांपर्यंत शून्य टक्क्यांनी कर्ज मिळणार!
➡️ पुणे जिल्ह्यातील लाखो शेतक-यांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने मोठी दिवाळी भेट देण्यात आली. ➡️ शुक्रवारी ३० सप्टेंबरला झालेल्या बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आता यापुढे शेतक-यांना ५ लाखांपर्यंतचे कर्ज शून्य टक्क्यांनी देण्याचा मोठा निर्णय घेतला. तीन लाखांवरील पुढील रकमेचे व्याज बँकेने स्वतःच्या नफ्यातून सोसण्यची सूचना उपमुख्यमंत्री यांनी सभेत केली आहे. ➡️ उपमुख्यमंत्री हे बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ऑनलाईन सहभागी झाले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, सध्या बँकेच्या प्रचलित धोरणानुसार ३ लाख रुपयापर्यंत चे पीक कर्ज शून्य टक्के व्याजदराने सभासद शेतकऱ्यांना दिले जाते. ➡️ यापुढे ही मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत वाढ करावी. ५ लाख रुपयांच्या पुढील रकमेचे व्याज बँकेने सोसावे अशी सूचना केली. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरू
7
2