हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ
या' जिल्ह्यात परतीच्या पावसाच्या जोरदार सरी!
मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्हा वगळता सर्वच जिल्ह्यात रविवारी व सोमवारी पावसाची शक्यता आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्र रविवारी व सोमवारी पावसाची उघडीप राहणे शक्य आहे. कोकण - कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी ४मी. मी पावसाची शक्यता आहे.मात्र रविवारी रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यात पावसाची उघडीप राहणे शक्य आहे. उत्तर महाराष्ट्र - जळगाव जिल्ह्यात सोमवारी ८मी. मी. पावसाची शक्यता आहे. रविवारी नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात पावसात उघडीप राहील तर सोमवारी नाशिक, धुळे, व नंदुरबार जिल्ह्यात पावसाची उघडीप राहील. मराठवाडा - रविवारी नांदेड जिल्ह्यात २४ मी. मी., परभणी जिल्ह्यात ४ मी. मी., हिंगोली जिल्ह्यात १० मी. मी., औरंगाबाद जिल्ह्यात १८ मी. मी.पावसाची शक्यता आहे. तसेच सोमवारी, लातूर जिल्ह्यात २१ मी. मी. नांदेड जिल्ह्यात ४० मी मी. बीड जिल्ह्यात ५ मी. मी. परभणी जिल्ह्यात ३० मी. मी. हिंगोली जिल्ह्यात १४ मी. मी. जालना जिल्ह्यात २३ मी. मी. व औरंगाबाद जिल्ह्यात ३२ मी. मी. पावसाची शक्यता आहे. पश्चिम विदर्भ - बुलढाणा व वाशीम जिल्ह्यात रविवारी ११ ते १४ मी. मी. तसेच वाशीम व अमरावती जिल्ह्यात १६ ते १९ मी. मी. पावसाची शक्यता आहे. सोमवारी बुलढाणा व अकोला जिल्ह्यात १७ ते २० मी. मी. पावसाची शक्यता असून वाशीम व अमरावती जिल्ह्यात २७ ते ३६ मी. मी. पावसाची शक्यता आहे. मध्य विदर्भ - रविवारी वर्धा, जिल्ह्यात १६ मी. मी., नागपूर जिल्ह्यात २० मी मी. यवतमाळ जिल्ह्यात २७ मी. मी. पावसाची शक्यता आहे. सोमवारी वर्धा जिल्ह्यात १९ मी. मी. नागपूर जिल्ह्यात १९ मी. मी. व यवतमाळ जिल्ह्यात ३६ मी. मी. पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भ : रविवारी चंद्रपूर जिल्ह्यात २४ मी. मी. पावसाची शक्यता आहे. भंडारा व गडचिरोली जिल्ह्यात ३१ ते ३६ मी. मी. व गोंदिया जिल्ह्यात ५२ मी. मी. पावसाची शक्यता आहे. सोमवारी चंद्रपूर जिल्ह्यात २१ मी. मी. व भंडारा जिल्ह्यात २६ मी. मी. पावसाची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र - सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यात ५ मी. मी. पावसाची शक्यता आहे. रविवारी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यात पावसाची उघडीप राहील. कृषी सल्ला - कोकणात हळव्या भात जातीची कंपनी व मळणी करावी हरभरा व ज्वारी पिकाची वेळेवर पेरणी करावी. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
110
21
इतर लेख