क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्तासकाळ
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाचे १७ कोटी रुपये!
👉अकोला : जिल्ह्यात फेब्रुवारी २०२० ते मे २०२० या कालावधीमध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. 👉यामध्ये ११ हजार २२२ हेक्टरवर क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे जिल्हाप्रशासनाने सादर केला होता. 👉त्यानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून १७ कोटी ४३ लाख १९ हजार रुपयांची मदत मंगळवार ता.२३ रोजी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली असून, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात येईल. 👉गतवर्षी जिल्ह्यात जिरायती व बागायती पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला याचा उत्पादनावर मोठा परिणाम झाला.त्यातच गतवर्षी फेब्रुवारीमध्ये आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला यामध्ये जिरायती तूर, हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.तर झाडांची पडझड,बगीचातील फळ गळून पडल्याने बागायती शेतीचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. 👉त्यामुळे नुकसानग्रस्त क्षेत्राचे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले होते.त्याअंतर्गत जिल्ह्यातील नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यात आल्यानंतर शासनाकडे मदतीची मागणी करण्यात आली होती.दरम्यान १७ कोटी ४३ लाख १९ हजार रुपये जिल्हा प्रशासनाला मिळाले असून सदर निधीचे विभाजन करुन ते तहसीलदारांच्या खात्यात वळती करण्यात आल्यानंतर प्राप्त निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.यासाठी जिल्हा प्रशासनाची युद्धपातळीवर कार्यवाही सुरू आहे. संदर्भ - सकाळ, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
54
13
संबंधित लेख