कृषी वार्तालोकमत
या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज मिळणार!
➡️ कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी पीक कर्ज देण्यात येणार आहे. बँकेच अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री यांनी बँकेच्या ८३ व्या वार्षिक सभेत ही घोषणा केली आहे ➡️ बँकेची वार्षिक आढावा बैठक सोमवारी झाली. यामध्ये यंदाच्या आर्थिक वर्षात नऊ हजार कोटी रुपयांच्या ठेवी आणि १७५ कोटी रुपयांच्या नफ्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले. शून्य़ टक्क्याने कर्ज देणारी केडीसीसी ही पहिलीच बँक असल्याचा दावा राज्याचे मंत्री यांनी केला. यामुळे तीन लाखांची कर्ज मर्यादा वाढवून पाच लाख करण्यात आली आहे. ➡️ संचालक मंडळाने प्रशासकाकडून सहा वर्षांपूर्वी बँकेची सूत्रे ताब्यात घेतली. तेव्हा बँक तोट्यात होती. गेल्या सहा वर्षांत १०३ कोटी रुपयांचा तोटा भरून काढत बँकेने १४५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमविला आहे. सध्ये बँकेत ७१४१ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. या ठेवी ९००० कोटी करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. ➡️ शेतकरी, दूध उत्पादक, इंडस्ट्रीज, साखर कारखानदार, सूत गिरण्या अशा विविध घटकांसाठी कर्ज मंजुरीचे धोरण अवलंबलेले आहे. बँकेने व्यवसाय वाढीसाठी व्यक्तिगत कर्जाच्या विविध योजना आणल्या आहेत. म्हैशीच्या दुधाचे उत्पादन वाढावे यासाठी दूध उत्पादकांना अर्थ पुरवठा करण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही राज्याचे मंत्री म्हणाले. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
7
2
इतर लेख