कृषी वार्ताकृषी जागरण
‘या’ गोष्टीसाठी शासन करणार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
नवी दिल्ली: केंद्रीय कृषी सहकार आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने महालनोबीस राष्ट्रीय पीक अनुमान केंद्राच्या सहकार्याने विविध राज्यांमध्ये पीक काढणीबाबत प्रायोगिक तत्वावर प्रयोग केले. खरीप हंगाम २०१८ आणि रब्बी हंगाम २०१९ या कालावधीत प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या या प्रयोगात ८ संस्था सहभागी झाल्या होत्या.
या प्रयोगिक अध्ययनानंतर असे आढळले की, पीक काढणी प्रयोगात संबंधित प्रदेश आणि पीक यांच्यानुसार पीक कापणीविषयक अनुमानातील आकडेवारीच्या चुकांमध्ये ३० ते ७० टक्के कपात होण्याची शक्यता असते. या निष्कर्षानंतर केंद्र सरकारने पीक काढणी प्रयोगासाठी स्मार्ट सॅम्पलिंग तंत्रज्ञान ९ राज्यातल्या ९६ जिल्ह्यात अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. २०१९ च्या खरीप हंगामातल्या धान पिकासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाईल. यासाठी उपग्रहावरुन मिळालेल्या माहितीचा आधार घेत स्थळ निवडले जाईल. पिकाचे एकूण उत्पादन मोजण्यासाठीची सॅटेलाईट, कृत्रिम बुद्धीमत्ता, मशीन लर्नींगसारख्या तंत्रज्ञानाच्या सहकार्याने सांख्यिकीय पद्धत वापरण्याचा प्रयोग यशस्वी झाला, तर तो प्रयोगही सगळीकडे वापरात आणता येईल अशी माहिती कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज राज्यसभेत दिली. संदर्भ – कृषी जागरण, २५ नोव्हेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
79
0
इतर लेख