क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
कृषी वार्ताकृषी जागरण
‘या’ गवतामुळे वर्षाला गहूचे ४ हजार करोडचे नुकसान होते
सध्या भारतासहित २५ देशांमधील शेतकऱ्यांना ‘चिकटा’ गवतामुळे नुकसान होत आहे. मुख्यत: या गवतामुळे गहू पिकाचे ८० टक्के उत्पादन कमी होत आहे. या कारणामुळे शेतकऱ्यांना जवळजवळ वर्षाला ४ हजार करोडचे नुकसान होत आहे. ही समस्या फक्त भारतातच नाही, तर इतर देशांमध्येदेखील निर्माण होत आहे. या संदर्भात नुकतीच एशियन पॅसिफिक वीड साइंस सोसाइटी, यांनी मलेशिया येथे २७ वी एपीडब्ल्यूएसएस पत्रकार परिषद आयोजित केली होती. या परिषदेमध्ये २५ देशातील ३३० प्रतियोगी सहभागी झाले होते. यावेळी सीसीएस हरियाणा कृषि विश्वविद्यालय (एचएयू) चे अॅग्रोनॉमीचे विभागाचे अध्यक्ष डॉ. समुंदर सिंह यांनी हे गवताला कसा आळा घालायचा याविषयी माहिती दिली.
सिंह म्हणाले, या गवतामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पेरणीनंतर त्वरित औषधाची फवारणी केली पाहिजे. यामुळे ७० ते ८० टक्के हे गवत कमी होईल. शेतकऱ्यांनी औषधे आलटून-पालटून वापरावे. शासन व आइसीएआर यांनी काही औषधांची शिफारस केली असून, त्याचा वापर करा असा सल्ला ही त्यांनी यावेळी दिला. संदर्भ – कृषी जागरण, १ ऑक्टोबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
213
0
संबंधित लेख