कृषी वार्ताअॅग्रोवन
‘या’ उदयोगासाठी आठ हजार कोटींची योजना
पुणे – देशातील शेतकऱ्यांसाठी सर्वात्तम जोडधंदा असलेल्या डेअरी उदयोगात केंद्र सरकार लवकरच आठ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. त्यातून देशातील सहकारी दूध संघांच्या प्रयोगशाळा तसेच दूध संकलन केंद्राना अनुदान मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ अर्थात एनडीडीबी यात महत्वाची भूमिका बजावत आहे. केंद्र शासनाने 2012 मध्ये ‘एनडीडीबी’च्याच माध्यमातून राष्ट्रीय दुग्धविकास योजना आणली होती. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात सव्वादोन हजार कोटी रूपये खर्च झाले. हा टप्पा याचवर्षी संपत आहे. पहिल्या टप्प्यातील कामांमुळे दुग्धोत्पादन वाढले, मात्र गुणवत्तेचा मुद्दा कायम राहिला. त्यामुळे दुसऱ्या टप्प्याकडे महाराष्ट्र, गुजरातसह देशातील सर्वच दूध संघांचे लक्ष लागून आहे.
दुसऱ्या टप्प्यात सहकारी दूध संघांना मुख्यत्वे प्रयोगशाळा बळकटीकरणासाठी अनुदान दिले जाणार आहे. पात्र संघांना प्रत्येकी पाच कोटी रूपये निधी देण्याची तयारीदेखील केंद्रशासनाची आहे. भेसळयुक्त दुधाचे सर्वच राज्यांमध्ये थैमान घातले आहे. त्यामुळे दूध संघांची गुण नियंत्रण यंत्रणा बळकट करण्याची आवश्यकता केंद्राला वाटते. यातूनच डेअरीच्या प्रयोगशाळांना इतक्या मोठया प्रमाणात प्रथमच अनुदान मिळणार आहे. दुधाची गुणवत्ता व संकलन या दोन्ही पातळयांवर काम करण्याची गरज केंद्र सरकारला वाटते आहे. त्यामुळे देशातील एक लाख दूध संकलन केंद्रांना प्रत्येकी सव्वा लाख रू. निधी देण्यासाठी आराखडा तयार केला जात आहे. संदर्भ – अॅग्रोवन, 28 सप्टेंबर 2019 जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
260
0
इतर लेख