AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
या आठवडयात थंडी कमी जाणवेल
हवामान अपडेटडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
या आठवडयात थंडी कमी जाणवेल
राज्यावर या आठवडयात १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील्यामुळे थंडीचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे राहील. यामध्ये पूर्व विदर्भावर १०१६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहिल्यामुळे या ठिकाणी थंडीची तीव्रता अधिक राहील. मात्र मध्य, उत्तर व पश्चिम राज्यात थंडी कमी होईल. पुणे जिल्हयात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३८ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ किमी राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयकडून राहील. उत्तर राज्यातील जळगाव जिल्हयात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. हवामान थंड व अत्यंत कोरडे राहील. सौम्य ते मध्यम स्वरूपात थंडी जाणवेल तसेच थंडी कमी होत जाईल.
कृषी सल्ला : १. बागायत क्षेत्रात पालेभाज्यांची लागवड करा – मेथी, कोथिंबीर, चुका, चाकवत, पालक, करडई, कांदेपात, कोथिंबीर लागवडीसाठी सपाट वाफे तयार करावेत. २. कार्ली, घोसाळी, दोडका, दुधीभोपळा, भेंडी, गवार लावा – उन्हाळी हंगामात वेल वर्गीय व इतर भाज्यांची लागवड केल्यास वाढ चांगली होते. तसेच या भाज्यांना चांगला सूर्यप्रकाश मिळाल्याने कीड रोगांचा प्रादुर्भाव होत नाही शिवाय मालाची प्रत चांगली येते. ३. ऊसाचे पाचट पेटवू नये ते जमिनीवर पसरावे. ४. दुष्काळात झाले वाचवा. ५. कलिंगड लागवड १५ फ्रेबुवारीपर्यत करावीत. ६. खरबूज लागवड फायदयाची. संदर्भ - डॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
12
0
इतर लेख