AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
यावर्षी सोयाबीन बियाण्याची पेरणी करताना हि काळजी घ्यावी !
गुरु ज्ञानअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
यावर्षी सोयाबीन बियाण्याची पेरणी करताना हि काळजी घ्यावी !
👉🏻सोयाबीन बियाण्याची पेरणी करताना हि काळजी घ्यावी : 👉🏻बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्केपर्यंत खाली आल्यावर साठवण करावी. 👉🏻ज्या ठिकाणी सोयाबीनची साठवण करावयाची आहे ती जागा ओलसर नसावी. 👉🏻मळणी केलेले बियाणे प्लास्टिकच्या पोत्यामध्ये साठवणूक करू नये. 👉🏻पेरणीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमता चाचणीसाठी शेतकऱ्यांनी स्वत:कडे असलेले बियाणेची चाळणी करुन त्यामधील काडी कचरा, खडे, लहान, खुरटलेले बियाणे वेगळे करावे. 👉🏻चाळणीनंतर स्वच्छ झालेले एका आकाराचे बियाणे चाचणीसाठी निवडावे. 👉🏻 प्रत्येकी १० बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून वर्तमानपत्राच्या टोकाच्या भागावर ठेवुन त्याची गुंडाळी करावी. 👉🏻 अशा रितीने १०० बियांच्या १० गुंडाळया पॉलीथीन पिशवीत चार दिवस तशाच ठेवाव्यात. चार दिवसानंतर त्या हळूहळू उघडून पाहून त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजाव्यात. 👉🏻जर ती संख्या ५० असेल तर उगवण क्षमता ५० टक्के आहे, असे समजले जाते. जर ती संख्या ८० असेल तर उगवण क्षमता ८० टक्के आहे असे समजावे. अशा पद्धतीने उगवण क्षमतेचाअंदाज घेता येतो. 👉🏻संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
48
2
इतर लेख