कृषि वार्तालोकमत
यंदा देशात दुष्काळाची शक्यता नाही - स्कायमेटचा अंदाज
नवी दिल्ली - मागील वर्षी मान्सून लांबल्यामुळे देशात दुष्काळाचे सावट होते. देशात अनेक ठिकाणी पिण्याचा पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. मात्र यंदा देशातील मान्सून सामान्य राहील, तसेच दुष्काळही पडणार नाही असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. स्कायमेटचे मुख्य एक्झिक्युटिव्हचे आधिकारी जतीन सिंह म्हणाले, २०१९-२० साठीचा मान्सूनचा पह ९६ ते १०४ टक्के पाऊस पडेल असा स्कायमेटचा अंदाज आहे. यंदा भारतात मान्सून सर्वसामान्य राहण्याची शक्यता ५० टक्क्यांहून अधिक असल्याचेदेखील त्यांनी यावेळी सांगितले. स्कायमेट ही हवामानाचा अंदाज वर्तवणारी एकमेव
खासगी संस्था आहे. दरम्यान, गेल्या ५० वर्षातील सरासरीचा विचार करता जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात देशात ९६ ते १०४ टक्के पाऊस पडेल. दरम्यान, मान्सूनबाबतचा स्कायमेटचा सुधारित अंदाज एप्रिल महिन्यामध्ये जाहीर होणार आहे. संदर्भ – लोकमत, २५ फेब्रुवारी २०१९
127
0
संबंधित लेख