AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
यंदा देशात कापूस क्षेत्रात वाढ
कृषि वार्ताअॅग्रोवन
यंदा देशात कापूस क्षेत्रात वाढ
मुंबई – देशातील चांगल्या पावसामुळे कापूस उत्पादक राज्यांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदा लागवड क्षेत्रात 5.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकूण कापूस लागवड क्षेत्र 12.4 दशलक्ष हेक्टरवर झाले असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माहितीतून समोर आले आहे. मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या आधारे लागवडीखालील क्षेत्राने 11.48 दशलक्ष हेक्टर क्षेत्राच्या पेरणीच्या क्षेत्राच्या तुलनेत वाढ केली आहे. प्रमुख कापूस उत्पादक गुजरात व मध्य प्रदेश वगळता कापूस उत्पादक इतर राज्यांमध्ये लागवड वाढली आहे. गुजरातमध्ये लागवडीचे क्षेत्रफळ 2.6 दशलक्ष हेक्टरवर 2.3 टक्के कमी होते. महाराष्ट्रात लागवड क्षेत्र 4.36 दशलक्ष क्षेत्र होते. त्यातुलनेत 7.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. संदर्भ – अॅग्रोवन, 28 ऑगस्ट 2019
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
53
0