AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
यंदाच्या वर्षी 106 % जास्त मान्सून!
हवामान अपडेटAgrostar
यंदाच्या वर्षी 106 % जास्त मान्सून!
👉🏻भारतात यंदाच्या वर्षी पर्जन्यमान सामान्य पातळीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षी देशात 87 सेंटीमीटरच्या दीर्घ-काळाच्या सरासरीच्या 106% असा एकूण पाऊस पडेल. ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत ला निना परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने नुकताच हवामानाचा अंदाज आणि मान्सून 2024 संदर्भात भाकीत केले. दरम्यान, हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी म्हटले की, एका बाजूला पावसाळ्याच्या दिवसांची संख्या कमी होत आहे तर मुसळधार पावसाच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे वारंवार दुष्काळ आणि पूर येतो. 👉🏻भारतीय हवामान विभागाचे प्रमुख महापात्रा यांनी म्हटले की, भारताने मान्सूनच्या हंगामात नऊ प्रसंगी सामान्यपेक्षा जास्त पाऊस अनुभवला जेव्हा ला निना नंतर एल निनो आले. 1951-2023 दरम्यानच्या आकडेवारीचा आधार देत महापात्रा यांनी सांगितले की, भारतामध्ये चार महिन्यांच्या मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस आणि दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या (87 सेमी) 106 टक्के असा एकत्रित पडेल, असेही ते म्हणाले. 👉🏻भारत हा कृषीप्रधान देश आहे. या देशातील 50% हून अधिक जनात ही शेतीवर अवलंबून असते. या देशातील नागरिकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. ही शेती सर्वस्वी पावसावरच अवलंबून असते. परिणामी पावसाकडे भारतीयांचे लक्ष नेहमीच लागून राहिलेले असते. त्यातही भारतामध्ये मान्सून हा पावसाचा महत्त्वाचा स्त्रोत मानला जातो. तर एकंदरीत यावर्षीचा मान्सून शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. 👉🏻संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
33
0