कृषी वार्ताद इकॉनॉमिक टाइम्स
यंदाचा मान्सून शेतीसाठी अनुकूल
मान्सून चांगल्या झाल्याने शेतीसाठी अनुकूल स्थिती बनली आहे. जलाशयात ही पाण्याचा चांगला साठा झाला आहे, खरीप पिकांची लागवड वेगाने सुरू झाली आहे. सुत्रांनुसार यंदा पिकांचे रिकॉर्ड उत्पादन होण्याचा शक्यता आहे. जलाशयामध्ये मागील १० वर्षाच्या सरासरीनुसार २५ टक्के जास्त पाण्याचा साठा झाला आहे. मागील ३० दिवसात लागवडीमध्ये जी घट झाली होती, आता ती भरून निघाली आहे. भाताची लागवडदेखील ऑगस्टपर्यंत पूर्ण होईन. पश्चिम बंगाल व झारखंडमध्ये ऑगस्टपर्यंत भाताची लागवड होते. कृषी मंत्रालयाच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या आकडयानुसार, तेलवर्गीयांची लागवड ही मागील वर्षा इतकीच आहे. कापसाची लागवड ही ५.६ टक्के जास्त आहे, जे की डाळवर्गीयांची लागवड ३.५ टक्के घट झाली आहे. भाताची लागवडीमध्ये ११ टक्के घट आहे. हा पाऊस खरीप व रबी पिकांसाठी फायदेमंद आहे. जलाशयामध्ये पाण्याचा स्तर चांगला आहे. भूमिगत जलचा स्तर ही उत्तम आहे. हंगामाच्या शेवटी होणारा मान्सूनचा चांगला पाऊस हा रबी पिकांसाठी उत्तम मानला जातो. संदर्भ – इकॉनॉमिक टाइम्स, १७ ऑगस्ट २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
64
0
संबंधित लेख