समाचारAgrostar
मोफत रेशन धारकांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय !
➡️केंद्र सरकारकडून सर्वसामान्य लोकांसाठी अनेक योजना आणल्या जातात. असे असताना यामध्ये अनेकदा बदल केला जातो. यामध्ये गोरगरीब कुटुंबांसाठी मोफत रेशन दिले जाते. यामुळे याचा अनेकांना लाभ मिळतो. असे असताना आता सरकार मोठा निर्णय घेत असून आता शिधापत्रिकाधारकांसाठी मोठी घोषणा केली आहे. यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळणार आहे. फुकट रेशन घेणाऱ्या अपात्रांकडून आता वसुलीचे काम होणार नाही, असा हा निर्णय घेतला आहे.
➡️तुम्ही अपात्र असूनही रेशन घेतले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. पुरवठा विभागाने हा आदेश देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. अनेकांनी याबाबत मागणी केली होती. यामुळे आता त्यांना दिलासा मिळाला आहे. याबाबत पुरवठा विभागाने आदेश काढले आहेत. यामुळे अपात्रांकडून मोफत रेशन वसुलीचा आदेश मागे घेतला आहे.
➡️ जिल्हा पुरवठा विभागाने अपात्र कार्डधारकांकडून वसुलीसाठी अनेक मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.तो निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. कार्डधारकांनी विनाकारण घाबरून जाण्याची गरज नाही. अपात्र कार्डधारकांकडून वसुलीबाबत जिल्हा पुरवठा विभागाकडून परिस्थिती स्पष्ट करण्यात आली आहे. याबाबत आता मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.
➡️संदर्भ:- Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.