AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मोफत मिळणार गॅस सिलिंडर!
समाचारAgrostar
मोफत मिळणार गॅस सिलिंडर!
➡️सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने गॅस सिलेंडरवरील २०० रुपये तर उज्ज्वला योजनेतील सिलेंडरवर ४०० रुपयांची सूट दिली होती. उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या अंतर्गत 75 लाख नवीन मोफत एलपीजी कनेक्शन वितरित केले जाणार आहे. ➡️उज्ज्वला योजना ही मोदी सरकारच्या प्रमुख योजनांपैकी एक आहे.उज्ज्वला योजनेंतर्गत सरकार मोफत एलपीजी गॅस सिलिंडर कनेक्शनवर प्रत्येक कनेक्शनसाठी 2200 रुपये सबसिडी देईल. तसेच पहिला सिलिंडर मोफत दिला जाईल. याचा संपूर्ण खर्च पेट्रोलियम कंपन्या उचलतील आणि मोफत गॅस शेगडीही पुरवतील. ➡️अशाप्रकारे, उज्ज्वला योजनेंतर्गत, स्वस्त सिलिंडरचा लाभ केवळ दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) लोकांनाच मिळतो. उज्ज्वला योजनेंतर्गत नोंदणी करण्यासाठी, लाभार्थ्यांना त्यांचे रेशन कार्ड (बीपीएल कार्ड) अपलोड करावे लागेल. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांनाच बीपीएल कार्ड उपलब्ध आहे. ➡️भारतात ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 27 हजार रुपयांपेक्षा कमी आहे आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांनाच कार्ड जारी केले जाऊ शकते. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलेचे वय १८ वर्षे असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाकडे आधीपासून कोणत्याही गॅस एजन्सीकडून इतर कोणतेही एलपीजी कनेक्शन नसावे. या योजनेचा लाभ सर्वसामान्य गरीब, अनुसूचित जाती, जमाती आणि अत्यंत मागासवर्गीय कुटुंबांना मिळणार आहे. ➡️संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
34
6
इतर लेख