AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मोदी सरकार देत आहे 4000 रुपये मिळवण्याची संधी!
कृषी वार्ताTV9 Marathi
मोदी सरकार देत आहे 4000 रुपये मिळवण्याची संधी!
शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने मोदी सरकारने काही योजना सुरू केल्या आहेत. दरम्यान यापैकी एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना आहे. पीएम शेतकरी सन्मान निधी योजना देशातील गरीब शेतकऱ्यांना बी-बियाणं, खतं खरेदी करण्याकरता निधी मिळावा याकरता राबवली जाते. मोदी सरकार कडून पीएम शेतकरी सन्मान निधी या योजनेअंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात. 2000 रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांना पाठवले जातात. ज्या शेतकऱ्यांकडे कमीत कमी 2 हेक्टर शेतीयोग्य जमीन आहे त्यांना हे पैसे पाठवले जातात. खात्यात येतील 4000 रुपये ➡️ या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्याला नोंदणी करणं आवश्यक असतं, त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे पाठवले जातात. आतापर्यंत सरकारकडून शेतकऱ्यांना 8 हप्ते पाठवण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत एकूण 9.5 कोटी शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. दरम्यान अद्यापही काही शेतकरी असे आहेत जे पात्र तर आहेत मात्र त्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही. अशा शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत डबल संधी सरकार देत आहे. या तारखेपर्यंत नोंदणी केल्यास तुमच्या खात्यात दोन हप्ते अर्थात 4000 रुपये येऊ शकतात. योजनेसाठी करू शकता ऑनलाइन रजिस्ट्रेशन ➡️ या योजनेत नोंदणी करणे अगदी सोपे आहे. तुम्ही घरी बसून ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही पंचायत सचिव किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर्सद्वारे या योजनेसाठी अर्ज करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही स्वत: या योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी देखील करू शकता. - याकरता तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. - त्यानंतर त्याठिकाणी दिसणाऱ्या 'फार्मर कॉर्नर' या टॅबवर क्लिक करा. - याठिकाणी 'New Farmer Registration' या पर्यायावर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक टाका. - कॅप्चा कोड प्रविष्ट करून तुमचे राज्य निवडा, त्यानंतरच प्रोसेस पुढे जाईल. - तुमची वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील विचारला जाईल. - ही माहिती भरल्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथेulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- tv9marathi. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
33
32
इतर लेख