AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मोदी सरकारच्या मदतीने सुरु करा नवा व्यवसाय!
कृषी वार्ताtv9marathi
मोदी सरकारच्या मदतीने सुरु करा नवा व्यवसाय!
➡️ साबणाचा बिझनेस सुरु करण्यासाठी फार कमी गुंतवणूक करावी लागते. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला पंतप्रधान मोदी सरकारच्या मुद्रा योजनेतंर्गत 80 टक्के रक्कम कर्ज म्हणूनही मिळते. मुद्रा योजनेंतर्गत कर्ज घेण्याचे बरेच फायदे आहेत. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला केवळ 4 लाख रुपयांची आवश्यकता असेल. 6 लाख रुपयांचा निव्वळ नफा ➡️ पंतप्रधान मुद्रा योजना प्रकल्पात या व्यवसायाबद्दल दिलेल्या माहितीनुसार, साबण तयार करणारे युनिट बसवण्यासाठी तुम्हाला जवळपास 4 लाख रुपये खर्च करावे लागतील. साबणाचे उत्पादन सुरु झाल्यानंतर तुम्ही वर्षभरात 4 लाख किलोग्रॅम साबण तयार करू शकाल. म्हणजे मूल्यानुसार ही रक्कम जवळपास 47 लाख रुपये असेल. यात व्यवसायामधील सर्व खर्च आणि इतर खर्च वजा करता तुम्हाला 6 लाख रुपयांचा निव्वळ नफा होईल. तर दरमहिना 50 हजार रुपये सहज कमावता येतील. 80 टक्क्यांपर्यंत कर्ज ➡️ सध्या काळात एखादा व्यवसाय सुरू करणे फार सोपे झाले आहे. सरकारकडूनच साबण कारखाना सुरु करण्याबाबतची संपूर्ण माहिती दिली जाईल. या माहितीमध्ये व्यवसायाशी संबंधित सर्व प्रकारच्या खर्चासह इतर बाबींविषयी माहिती देण्यात आील आहे. तसेच जर तुमच्याकडे भांडवल नसेल तर मुद्रा योजनेंतर्गत तुम्हाला 80 टक्क्यांपर्यंत कर्ज सहज मिळू शकते. या योजनेंतर्गत कर्ज घेण्यासाठी आपल्याला प्रकल्प अहवाल तयार करण्याची देखील आवश्यकता नाही. हे कर्ज सरकार तुम्हाला स्वत: प्रदान करत आहे. किती जागेची आवश्यकता? ➡️ साबण बनवण्याचे युनिट बसवण्यासाठी तुम्हाला एकूण 750 चौरस फूट जागेची आवश्यकता असेल. यातील 500 चौरस फूट व्यापलेले हवे. तर उर्वरित भाग हा खुला असावा. यात सर्व प्रकारच्या मशीनसह 8 प्रकारचे उपकरणं बसवण्यात येतील. या प्रकल्पाच्या अहवालानुसार या मशीन्स बसवण्याची एकूण किंमत फक्त 1 लाख रुपये इतकी आहे. सुरुवातीचा खर्च किती? ➡️ साबण बनवण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करण्यासाठी एकूण 15,30,000 रुपये खर्च येतो. यात तीन महिन्यांकरिता युनिट, यंत्रसामग्री, कार्यरत भांडवलाचा समावेश आहे. यातील 15.30 लाख रुपयांपैकी तुम्हाला केवळ 3.82 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तर उर्वरित रक्कम ही तुम्हाला मुद्रा योजनेंतर्गत मिळू शकते. सरकार कशी करणार मदत? हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे 4.23 लाख रुपये आहेत, हे दाखवावे लागेल. यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत तुम्ही कोणत्याही बँकेत कर्जासाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल, ज्यामध्ये नाव, पत्ता, व्यवसाय सुरु करण्याचे ठिकाण, शिक्षण, सध्याचे उत्पन्न आणि कर्जाची रक्कम इत्यादींची माहिती द्यावी लागेल. या योजनेंतर्गत तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रक्रिया शुल्क किंवा हमीची रक्कम देण्याची गरज भासत नाही. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथेulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- tv9marathi हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
21
15
इतर लेख