AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना वार्षिक मिळतील 42000 रुपये!
कृषी वार्तालोकमत न्युज १८
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना वार्षिक मिळतील 42000 रुपये!
➡️ तुम्ही जर दरमहा 3000 रुपयांचा फायदा मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत हा लाभ मिळतो आहे. तुम्ही जर पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला आणखी एका योजनेचा फायदा घेता येईल. ज्याअंतर्गत वार्षिक 36 हजारांचा लाभ तुम्हाला घेता येईल. अर्धात पीएम शेतकरी सन्मान निधीची रक्कम मिळून हा फायदा 42 हजारांचा होईल. जाणून घ्या काय आहे ही योजना. कसे मिळतील 42000 रुपये? ➡️ पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरमहा 3000 रुपये पाठवले जातात. तर शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत वार्षिक 6000 रुपयांचा लाभ मिळतो. अशा दोन्ही योजनांचे मिळून शेतकऱ्यांना 42 हजार रुपयांचा लाभ मिळेल. कुणाला मिळेल फायदा? ➡️ पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेअंतर्गत 18 ते 40 वर्षापर्यंतच्या शेतकऱ्यांना लाभ घेता येईल. मात्र अट अशी आहे की शेतकऱ्याकडे कमीतकमी 2 हेक्टर जमीन असणं आवश्यक आहे. त्यांना दरमहा कमीतकमी 55 रुपये ते जास्तीत जास्त 200 रुपयांचा प्रीमियम भरावा लागेल. किती द्यावा लागेल प्रीमियम? ➡️ तुम्ही जर वयाच्या अठराव्या वर्षी या योजनेशी जोडले गेलात तर दरमहा तुम्हाला 55 रुपयांचे योगदान द्यावे लागेल, जर वयाच्या 30 व्या वर्षी तुम्ही या योजनेशी जोडले गेलात तर तुम्हाला दरमहा 110 रुपये आणि वयाच्या चाळीसाव्या वर्षी तुम्ही जोडले गेलात तर दरमहा 200 रुपयांचा प्रीमियम द्यावा लागेल. ➡️ मानधन योजना एकप्रकारे पेन्शन योजनेसारखीच आहे, ज्यामध्ये छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरमहा पेन्शन दिली जाते. ही पेन्शन शेतकऱ्यांना 60 व्या वर्षानंतर दिली जाते. संदर्भ:- लोकमत न्युज१८. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
64
25
इतर लेख