AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मोठे पाऊल: अखिल भारतीय कृषी परिवहन कॉल सेंटर सुरू!
कृषी वार्ताAgrostar
मोठे पाऊल: अखिल भारतीय कृषी परिवहन कॉल सेंटर सुरू!
लॉकडाऊनमध्ये कृषी क्षेत्राला दिलासा देण्यासाठी कृषी मंत्रालयाने अखिल भारतीय कृषी परिवहन कॉल सेंटर सुरू केले आहे. सरकारचा असा विश्वास आहे की देशात कृषी परिवहन कॉल सेंटर सुरू केल्याने शेतीच्या निविष्ठांच्या (शेतीशी संबंधित वस्तू) आंतरराज्यीय वाहतुकीत येणाऱ्या अडचणी लवकरच दूर होतील. मदतीसाठी या क्रमांकावर कॉल करू शकता_x000D_ कृषी मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ऑल इंडिया अ‍ॅग्री ट्रान्सपोर्ट कॉल सेंटरला दोन नंबर आहेत (18001804200 आणि 14488) ज्याला कॉल करता येईल. हा कॉल कोणत्याही लँडलाईन किंवा मोबाइल फोनवरून केला जाऊ शकतो._x000D_ हे लोक मदतीसाठी विचारू शकतात_x000D_ आता देशभरात भाजीपाला आणि फळांची आंतरराज्यी वाहतूक सुरळीत पार पाडली जाईल. ट्रक चालक, ट्रान्सपोर्टर, व्यापारी, किरकोळ विक्रेता किंवा इतर कोणालाही ज्याला वरील वस्तूंच्या आंतरराज्यीय वाहतुकीत समस्या येत आहे, ते कॉल सेंटरवर कॉल करून मदतीसाठी विचारू शकतात._x000D_ स्रोत: - Agrostar, 14 एप्रिल 2020_x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ती लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेयर करा._x000D_
136
0
इतर लेख