कृषी वार्ताAgrostar
मोठी बातमी ! वन्य प्राण्यांनी हल्ला केल्यास मिळणार मदत !
➡️राज्य सरकारने वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृतांच्या नातेवाईकांना मोठी मदत करण्याचा निर्णय घेऊन मोठा दिलासा दिला आहे. वन्य प्राण्यांच्या हल्यात मृतांच्या नातेवाईकांना 20 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. यासह जखमी आणि पशुहानी झाल्यास देण्यात येणाऱ्या मदतीतही मोठी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. किती वाढ करण्यात आली? याविषयी आपण माहिती जाणून घेऊया.
➡️पाळीव प्राण्यांसाठी : गाय, म्हैस आणि बैलाचा मृत्यू झाल्यास बाजारभावाच्या ७५ टक्के किंवा ७० हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती देण्यात येणार आहे.
➡️तसेच कायमचे अपंगत्व आल्यास बाजारभावाच्या ५० टक्के किंवा १५ हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती, मेंढी, बकरी आणि इतर पशुधनाचा मृत्यू झाल्यास बाजारभावाच्या ७५ टक्के किंवा १५ हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती देण्यात येणार आहे.
➡️तसेच पाळीव जनावरांच्या औषधोपचारासाठी खर्च देण्यात येणार आहे. हे औषधोपचार शासकीय किंवा जिल्हा परिषदेच्या पशुचिकित्सालयांमध्ये मोफत करण्यात येतील. या आधी हत्तीमुळे झालेल्या हानीपोटी ५० हजार ते एक लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. राज्यात वाघ, बिबट्या, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, मगर, हत्ती, रानकुत्र्यांच्या हल्ल्यांत अलीकडे मोठी वाढ झाली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना प्राण गमवावा लागला आहे. तसेच अनेकदा गायी, म्हशी, बैल, शेळ्या मेंढ्यांवरही हल्ले होतात. या हल्ल्यांत पशुहानीही होत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्यास 75 टक्के रक्कम दिली जाणार आहे.
➡️संदर्भ:- Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.