AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा!
कृषी वार्ताअ‍ॅग्रोवन
मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा!
➡️ राज्यात पावसाने पुन्हा उघडीप दिली आहे. अनेक ठिकाणी अंशत: ढगाळ हवामानासह कोरडे हवामान होत आहे. पुढील चार ते पाच दिवस पूर्व विदर्भ वगळता उर्वरित राज्यात पावसाची विश्रांती कायम राहणार असून, तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. पूर्व विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण असल्याने उद्यापासून मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा इशारा वर्तविला आहे. ➡️ बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात चक्रीय स्थिती सक्रिय झाली आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर असल्याने पूर्व विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ➡️ सकाळपर्यंतच्या २४ तासांत मराठवाड्यात काही ठिकाणी, कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पावसाला पोषक हवामान नसल्याने बहुतांशी ठिकाणी पावसाने उसंत घेतली आहे. पावसाची उघडीप कायम राहण्याची शक्यता आहे. उद्या कोकणात काही ठिकाणी उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ब्रह्मपुरी येथे ३४.८ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. येथे होणार पाऊस बुधवार: संपूर्ण राज्यात तुरळक सरी गुरुवार : वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, संपूर्ण राज्यात तुरळक सरी शुक्रवार : वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, संपूर्ण राज्यात तुरळक सरी शनिवार : वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, संपूर्ण राज्यात तुरळक सरी 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
99
11
इतर लेख