AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानAgrostar India
मृदा परीक्षण प्रयोगशाळा करा सुरू!
👉🏻कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊनची स्थिती आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग बंद पडल्यामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. शहरात काम करणाऱ्यांना परत आपल्या गावी परतावे लागत आहे. यामुळे बेरोजगारांचे प्रमाण वाढत आहे. मात्र या बेरोजगारांना शासनाने आशेचा किरण दाखविला आहे. 👉🏻केंद्रशासनाची यांच्यासाठी एक योजना आहे. या योजनेतून ते अधिक कमवू शकतात. ही योजना आहे, स्वाईल हेल्थ कार्ड बनवणे, माती स्वास्थ्य कार्ड योजना. या योजनेव्दारे आपण गावात लहान स्वरुपात एक टेस्टिंग लॅब सुरू करून, माती परीक्षण करु शकता. यासाठी शासनाने 3.75 लाख अनुदानदेखील देत आहे. या योजनेबाबत अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ आवश्य पहा. संदर्भ:- Agrostar India. 👉🏻हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
61
14
इतर लेख