AgroStar
मूग पिकातील पिवळा मोझॅक व्हायरस समस्या आणि उपायोजना!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
मूग पिकातील पिवळा मोझॅक व्हायरस समस्या आणि उपायोजना!
➡️मूग पिकात मोझॅक व्हायरस मुळे सुरुवातीला झाडाच्या पानांवर पिवळे ठिपके दिसून येतात कालांतराने ठिपके मोठे होऊन संपूर्ण पान व झाड पिवळे पडते. ➡️अशा प्रादुर्भाव ग्रस्त झाडांना कमी फुले व शेंगा लागतात तसेच शेंगाचा आकार लहान राहून जातो. हा विषाणूजन्य रोग सफेद माशी या रसशोषक किडीमुळे पसरला जातो. ➡️यावर उपाययोजना म्हणून पेरणी नंतर सुरुवातीचे ४० दिवस प्रादुर्भावग्रस्त झाडे जमिनीतून काढून नष्ट करावी. तसेच तण नियंत्रित ठेवावे. रसशोषक किडींना प्रतिबंध म्हणून नीम तेल @ 3 मिली प्रति लिटर पाणी प्रमाणे घेऊन पिकात फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा
7
1
इतर लेख