AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता!
हवामान अपडेटAgroStar India
मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता!
➡️ गुलाब चक्रीवादळाचा मोठा परिणाम आज महाराष्ट्रात जाणविण्याची आहे. विदर्भ मराठवाड्यासह ११ जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढच्या काही दिवसांत परतीचा पाऊस धुमाकूळ करेल, असा इशारा के एस होसाळीकर यांनी दिला आहे. पुढचे ४ दिवस राज्यांतल्या विविध भागांत कमी अधिक प्रमामात पावसाची शक्यता आहे. ➡️ बंगालच्या उपसागरावर शनिवारी कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन तयार झालेले गुलाब चक्रीवादळ हे पूर्व किनारपट्टीकडे सरकत आहे. हे वादळ काल रात्री( २६ सप्टेंबर) गोपाळपूर आणि कलिंगपट्टणममध्ये धडकलं. यामुळे पूर्व किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता आहे. पुढील ३-४ दिवस महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे आज विदर्भ आणि मराठवाडा, तर २८ तारखेला मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात पावसाची काय स्थिती! आज सप्टेंबरपासून विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. वेगाने वारे वाहतील. कोकणात २८ सप्टेंबरदरम्यान वाऱ्याचा वेग वाढेल तर काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडेल. समुद्र तटिय क्षेत्रात राहणाऱ्या लोकांनी सावधागिरी बाळगण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलंय. हवामान विभागाकडून राज्यात ११ ​जिल्ह्यांना रेड अलर्ट आज म्हणजेच २७ सप्टेंबर रोजी पुणे, नाशिक, सातारा, रायगड, रत्नागिरी, लातूर, परभणी, हिगोंली, नांदेड, यवतमाळ, गडचिरोलीसह 11 जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. आज अतिवृष्टीची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- TV9 Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
135
30
इतर लेख