AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी दररोज वाचवा 130 रुपये!
समाचार न्यूज १८ लोकमत
मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी दररोज वाचवा 130 रुपये!
➡️नवीन वर्षात लोकांनी नवे आर्थिक नियोजन तयार केले असतील. आपल्या मुलांच्या विशेषतः मुलीच्या भविष्यासाठी नियोजन केले जात आहे. जर तुम्ही मुलीचे वडील असाल, मुलीच्या जन्मापासूनच तिच्या भविष्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. ➡️तुम्हालाही तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पैसे गोळा करायचे असतील, तर भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC ची कन्यादान पॉलिसी यामध्ये उपयुक्त ठरू शकते. एलआयसी कन्यादान पॉलिसीमध्ये, तुम्हाला दररोज फक्त १३० रुपये वाचवावे लागतील. म्हणजेच तुम्हाला एका महिन्यात ३९०० रुपये वाचवावे लागतील. या बचतीतून तुम्ही २७ लाख रुपये जमा करू शकता. एलआयसी जीवन लक्ष्य पॉलिसी ➡️एलआयसीकडे कन्यादान पॉलिसी नावाची वेगळी योजना नाही, परंतु ती एलआयसी जीवन लक्ष्य पॉलिसीची कस्टमाईज योजना आहे. विमा एजंट मुलीच्या लग्नासाठी ही योजना कस्टमाईज करतात आणि कन्यादान पॉलिसीच्या नावाने विकतात. ही योजना कशी घ्यावी? ➡️LIC ची कन्यादान पॉलिसी किंवा जीवन लक्ष्य योजना खरेदी करण्यासाठी आधार कार्ड, उत्पन्नाचा पुरावा, ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा आणि पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक आहे. अर्जासोबत मुलीच्या जन्म प्रमाणपत्रासह स्वाक्षरी केलेला अर्ज आणि पहिल्या प्रीमियमचा धनादेश असतो. फायदे ➡️एलआयसी कन्यादान पॉलिसीची मॅच्युरिटी २५ वर्षे आहे, परंतु प्रीमियम फक्त २२ वर्षांसाठी भरावा लागेल. शेवटच्या तीन वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागणार नाही. LIC कन्यादान पॉलिसीची २५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला २७ लाख रुपये दिले जातील. या पॉलिसीमध्ये दरवर्षी जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. तुम्ही LIC कन्यादान पॉलिसी २५ वर्षांच्या ऐवजी १३ वर्षांसाठी घेऊ शकता. लग्नाव्यतिरिक्त हा पैसा मुलीच्या शिक्षणासाठीही वापरता येईल. पॉलिसी कोण घेऊ शकतं? ➡️एलआयसी कन्यादान पॉलिसी १८ ​ते ५० वर्षे वयोगटातील वडील घेऊ शकतात. मुलीचे वय किमान 1 वर्ष असावे. ही एलआयसी कन्यादान पॉलिसी योजना तुमच्या आणि तुमच्या मुलीच्या वेगवेगळ्या वयानुसार देखील उपलब्ध होऊ शकते. संदर्भ:- न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
41
12
इतर लेख