AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मुलीच्या लग्न-शिक्षणासाठी पैशांचं नो टेन्शन; घ्या या योजनेचा लाभ!
योजना व अनुदानलोकमत न्युज १८
मुलीच्या लग्न-शिक्षणासाठी पैशांचं नो टेन्शन; घ्या या योजनेचा लाभ!
पंजाब नॅशनल बँक नेहमी त्यांच्या ग्राहकांसाठी विविध योजना आणत असतं. तुम्ही PNB मध्ये सुकन्या समृद्धी खातं उघडून तुमच्या मुलीचं भविष्य सुरक्षित करू शकता. पंजाब नॅशनल बँकेने तुमच्या मुलींचे भविष्य सुरक्षित बनवण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना आणली आहे.. या योजनेच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलींचं भविष्य सुरक्षित करू शकता. या योजनेमध्ये आई-वडील किंवा गार्डियन त्यांच्या मुलीच्या नावे एकच खाते उघडू शकतात. त्याचप्रमाणे दोन मुलींच्या नावे जास्तीत जास्त दोन खाती उघडता येतील. किती आहे डिपॉझिट? ➡️ या योजनेमध्ये कमीतकमी डिपॉझिट 250 रुपये तर जास्तीत जास्त डिपॉझिट 150000 रुपये आहे. या योजनेमध्ये खातं उघडल्यानंतर तुमच्या मुलीचं शिक्षण किंवा त्यानंतर होणाऱ्या खर्चासाठी मोठी मदत मिळू शकते. किती मिळेल व्याज? ➡️ सुकन्या समृद्धी अकाउंटमध्ये तुम्हाला 7.6 टक्के व्याज मिळते आहे. या योजनेत मिळणाऱ्या व्याजावर कर सवलत देण्यात येते. याआधी या योजनेमध्ये 9.2 टक्के व्याज मिळत होते. मॅच्युरिटीवर 15 लाखापेक्षा अधिक रक्कम मिळेल ➡️ तुम्ही या योजनेमध्य दरमहा 3000 रुपयांची गुंतवणूक केली तर वार्षिक 36000 रुपये गुंतवणूक होतील. 14 वर्षानंतर 7.6 टक्के वार्षिक कंपाउंडिंगच्या हिशोबाने तुम्हाला 9,11,574 रुपये मिळतील. 21 वर्ष अर्थात मॅच्युरिटीपर्यंत ही रक्कम जवळपास 15,22,221 रुपये असेल. कुठे उघडाल खातं? ➡️ पंजाब नॅशनल बँकेमध्ये तुम्ही हे खातं उघडू शकता. शिवाय तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये किंवा कमर्शिअल बँकेच्या अधिकृत शाखेमध्ये हे खातं उघडू शकता. सुकन्या समृद्धी खातं सुरू केल्यानंतर तुमची मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत किंवा 18 वर्षानंतर तिचं लग्न होईपर्यंत चालू ठेवता येईल. जर वार्षिक 250 रुपये नाही भरले तर तुमचं खातं बंद होईल. ज्यावर्षी तुम्ही ही कमीतकमी रक्कम भरणार नाही, त्यावर्षानंतर खाते पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला कमीतकमी रकमेबरोबर दंड म्हणून 50 रुपये द्यावे लागतली. द्यावे लागतील हे दस्तावेज ➡️ सुकन्या समृद्धी खातं उघडण्यासाठी असणारा फॉर्म, मुलीचा जन्मदाखला, आईवडील किंवा गार्डियनचे ओळखपत्र- पॅन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट इ., जमाकर्ताच्या पत्त्याचा दाखला जसं की पासपोर्ट, रेशन कार्ड, वीजबिल, टेलिफोन बिल इ. पैसे जमा करण्यासाठी तुम्ही नेट बँकिंगचा देखील वापर करू शकता. खाते उघडल्यानंतर पोस्ट ऑफिस किंवा बँकेप्रमाणे तुम्हाला पासबुक दिलं जाईल. संदर्भ:- लोकमत न्युज१८ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
13
इतर लेख