AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
 मुलीच्या नावाने खातं उघडा, 30सप्टेंबरपर्यंत मिळतोय दुप्पट फायदा!
समाचारTV9 Marathi
मुलीच्या नावाने खातं उघडा, 30सप्टेंबरपर्यंत मिळतोय दुप्पट फायदा!
➡️ देशातील मुलींच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद व्हावी, या उद्देशाने मोदी सरकारने सुकन्य समृद्धी योजना सुरु केली होती. या योजनेतंर्गत बँकेत जमा होणाऱ्या पैशांवर कर लागत नाही. आता देशातील आघाडीची सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांना एक खास सुविधा देऊ केली आहे. त्यानुसार बँकेत उघडल्या जाणाऱ्या सुकन्या समृद्धी खात्यांसाठी विशेष लाभ दिला जाणार आहे. ➡️ तुम्ही कमीतकमी २५० रुपयांचे डिपॉझिट जमा करुन पंजाब नॅशनलबँकेत सुकन्या समृद्धी खाते उघडू शकता. या खात्यात तुम्ही दरवर्षी १,५०,००० रुपयांची गुंतवणूक करु शकता. मुलीचे वय दहा वर्षांपेक्षा कमी असले पाहिजे. अशाप्रकारची जास्तीत जास्त दोन खाती उघडली जाऊ शकतात. या खात्यांमध्ये जमा होणाऱ्या पैशांवर सेक्‍शन ८०सी अंतर्गत कोणताही कर लागत नाही. व्याज किती मिळते? ➡️ सुकन्या समृद्धी योजनेतील गुंतवणुकीवर वार्षिक ७.६टक्के इतके व्याज मिळते. केंद्र सरकार दर तीन महिन्यांनी अल्पबचत योजनांवरील व्याजदराचा फेरआढावा घेते. यामध्ये सुकन्या समृद्धी योजनेचाही समावेश आहे. सध्याच्या घडीला सर्वाधिक व्याजदर मिळणाऱ्या योजनांमध्ये SSY चा समावेश आहे. ➡️ पंजाब नॅशनल बँकेने देऊ केलेल्या सुविधेनुसार, तुम्ही बँकेच्या कोणत्याही शाखेत SSYखाते उघडू शकतो. टपाल कार्यालय आणि व्यावसायिक बँकांमध्येही तुम्हाला SSY खाते उघडता येऊ शकते. एखाद्या गरीब कुटुंबातील मातापित्यांनी दरदिवशी मुलीच्या नावावर १०० रुपये जमा केले तरी वर्षाला ३६००० रुपये खात्यात जमा होतात. सध्याचा ७.४ टक्क्यांच्या व्याजाने १४ वर्षांनी हा आकडा १५,२२,२२१ रुपये इतका असेल. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:-TV9Marathi, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
47
15
इतर लेख