AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
मुलींच्या जन्मावर मिळणार लाख रुपये!
गुरु ज्ञानAgrostar
मुलींच्या जन्मावर मिळणार लाख रुपये!
👉🏻महाराष्ट्र सरकारने गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना 1,01,000 रुपये देण्याची कल्याणकारी योजना लागू केली आहे. या योजनेचे नाव 'लेक लाडकी' योजना आहे. महाराष्ट्रात याआधीच सुरू असलेल्या 'माझी कन्या भाग्यश्री' योजनेचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे. 👉🏻मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन त्यांचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यूदर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे आणि मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे यासाठी लेक माझी लाडकी ही योजना राबविण्यात येत आहे. 👉🏻पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, ११ वीत गेल्यावर ८ हजार रुपये, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये, अशा रितीने एकूण त्या मुलीस १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ मिळेल. 👉🏻लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 साठी पात्रता निकष - अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. - लेक लाडकी योजनेसाठी राज्यातील फक्त मुलीच पात्र असतील. - कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. - राज्यातील पिवळे आणि केशरी शिधापत्रिका असलेल्या मुलींचीच कुटुंबे या योजनेसाठी पात्र असतील. - 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना योजनेचा लाभ मिळेल. 👉🏻संदर्भ: Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
33
4
इतर लेख